जपानी सुविधा केंद्र, टोकियो फाउंडेशन आणि निप्पॉन फाउंडेशन यांच्या वतीने पुस्तकांची भेट pcmc
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : जपानला आधुनिक तंत्रज्ञाना बरोबरच कला, संस्कृती, धार्मिक इतिहास आहे. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जपान मध्ये यायचे आहे त्यांना जपानी संस्कृती, भाषा अभ्यासाची संधी ‘रिड जपान प्रोजेक्ट’ या प्रकल्पामुळे मिळाली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घेतला पाहिजे असे, मत मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूत यागी कोजी यांनी व्यक्त केले. pcmc
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) निगडी येथील पिंपरी चिंचवड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे मंगळवारी (२८ मे) जपान सुविधा केंद्रांतर्गत टोकियो फाउंडेशन आणि धोरण संशोधन, निप्पॉन फाउंडेशन यांच्या वतीने दीडशे पुस्तकं भेट देण्यात आली.
यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जपानी भाषा विभागातील डॉ. हरी दामले, प्रोसीड टेक्नॉलॉजीजच्या स्वाती भागवत, समीर लघाटे, फिडेल टेक्नॉलॉजीज, टोकियो, जपानच्या प्राची सुनील कुलकर्णी, सिमिटीस्यु फॅक्टरी ऑटोमेशन ग्रुप व्यवस्थापकीय संचालक हैदर आलम खान, भाषा अकादमी, पुणेचे दीपक पागे, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे, आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या प्रमुख डॉ. रोशनी राऊत, विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक उपस्थित होते. पीसीईटीच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
जागतिक पातळीवर अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून पीसीईटीने नावलौकिक प्राप्त केला आहे. पीसीसीओई मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. विविध शैक्षणिक स्पर्धा, कला, सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थी सहभागी होतात.
पीसीईटीने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विद्यापीठे, संस्था यांच्या बरोबर शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत. विद्यार्थ्यांना जपानी संस्कृतीशी ओळख होण्यासाठी ‘रिड जपान प्रोजेक्ट’ उपयुक्त ठरेल, असे डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.
पीसीईटीचा ३६ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार – डॉ. गिरीश देसाई
पीसीईटीने ३६ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत सामंजस्य करार केले आहेत. फ्रांस मधील नैंसी पॉलीटेक, लॉरेन विद्यापीठ येथील २ विद्यार्थी “३ डी कॉन्क्रेट प्रिंटिंग” या विषयावर पीसीसीओई मध्ये ४ महिन्यांच्या इंटर्नशिप करत आहेत. pcmc
विद्यार्थी नेपाळ, बांगलादेशातील बरेच विद्यार्थी पीसीसीओई मध्ये शिक्षण घेत आहेत. तसेच सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका यासारख्या देशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. पीसीसीओई मधून देखील परदेशी पीएचडी आणि पोस्ट डॉक्टरेट अभ्यासासाठी प्राध्यापकांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिटी यूनिवर्सिटी न्यूयॉर्क आणि कोलंबिया यूनिवर्सिटी येथून सुमारे ४० विद्यार्थी स्टडी टूर साठी पीसीईटीच्या शैक्षणिक संकुलाला नुकतीच भेट दिली.
युटीपी पेट्रोनास मलेशियासह संयुक्त बी. टेक प्रकल्प पर्यवेक्षण देखील चालू आहे. पीसीसीओईचे विद्यार्थी जून २०२४ मध्ये एलएसआय विकास आणि संशोधन लॅब जपानमध्ये इंटर्नशिप करणार आहेत.
तसेच श्रीलंका, भूतान, दक्षिण आफ्रिका, सिंगापुर यांसारख्या अनेक देशांचे वाणिज्य दूतावासातील अधिकारी पीसीईटीला भेट देत असतात, अशी माहिती डॉ. गिरीश देसाई यांनी दिली.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी
संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले
धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या
पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त
अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल
जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी
मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता
ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी
लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का
मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई
माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !
ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान
NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन
ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी मुंबई परिवहन आयुक्त येथे बैठक