कराची : पाकिस्तानचे सुप्रसिद्ध अँकर आणि खासदार आमीर लियाकत हुसैन यांचे कराचीमध्ये निधन झालंय. आमिर लियाकत हुसैन सोशल मीडियावर व्हिडिओ मीम्सच्या माध्यमातून जगभरात पोहचले होते.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या संदर्भातील माहिती मिळताच पोलीस अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप सांगता येणार नसून, पोस्टमार्टम करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सरकारी नोकरी : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत 8106+ जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ते तिसर्याा लग्नामुळे वादात सापडले होते, त्यानंतर त्यांनी देश सोडण्याची घोषणाही केली होती. त्यांच्या निधनावर पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी शोक व्यक्त केला आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1920 रिक्त पदांसाठी भरती, 13 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
आमिर लियाकत हुसैन हे पाकिस्तानातील जवळपास प्रत्येक मोठ्या वृत्तवाहिनीशी संबंधित होते, त्यांचे अनेक कार्यक्रम वादांनी भरलेले असायचे, ज्याचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरही परिणाम झाला. अमीर लियाकत हुसैन यांनी 2002 च्या सार्वत्रिक निवडणुकीत MQM च्या तिकिटावर नॅशनल असेंब्लीची जागा जिंकली आणि परवेझ मुशर्रफ यांच्या कारकिर्दीत त्यांना धार्मिक व्यवहार मंत्री करण्यात आले होते.
नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख