सेऊल : जेजू एअर बोइंग 737-800 प्रवासी विमानातील 181 व्यक्तींपैकी जवळपास सर्व प्रवासी मृत झाल्याचे वृत्त द गार्डियन न्युज ने प्रसारित केले आहे. दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचा मोठा अपघात झाला आहे. येथे विमान उतरताना जेजू एअरलाइन्सच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात 179 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. (Plane crash)
मिळालेल्या माहितीनुसार, जेजू एअरचे हे विमान थायलंडहून परतत होते. दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर उतरताना विमान घसरले आणि भिंतीवर आदळले. भिंतीवर आदळताच विमानाने पेट घेतला. योनहाप न्यूज एजन्सीनुसार, विमानात 179 प्रवासी (173 दक्षिण कोरियाचे आणि 2 थाई नागरिक) आणि 6 क्रू मेंबर्स होते. (Plane crash)
अपघाताची माहिती मिळताच मदत कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. विमानातील लोकांना बाहेर काढण्यात आले. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष चोई सुंग-मोक यांनी बचाव कार्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ही पहिली मोठी घटना आहे. हे दक्षिण जिओला प्रांताचे महत्त्वाचे प्रादेशिक केंद्र आहे.
लँडिंगच्या वेळी रनवेवर अचानक विमान विमानतळाच्या भिंतीला जाऊन धडकले. जेजू एअरचे विमान थायलंडबून परत येत असताना मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झालाय. लँडिंग करताना विमान धावपट्टीवर घसरले अन् भिंतीला जाऊन धडकले.
हे ही वाचा :
मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता
मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता
इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!
प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन
प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण
गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ