Monday, December 30, 2024
Homeग्रामीणएसएफआयच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना क्रांतीकारी अभिवादन

एसएफआयच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना क्रांतीकारी अभिवादन

वडवणी, (लहु खारगे) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वडवणी शहरातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी अभिवादन सभेस उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रांतिकारी अभिवादन केले.

स्त्री शिक्षणाचे जनक व समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना छेद देऊन समाजाचे प्रबोधन करणारे, जगातील पहिली शिवजयंती साजरी करणारे, केशवपण सारख्या प्रथा बंद करणारे व देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करणारे, शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी खऱ्या अर्थाने भारतीय कार्ल मार्क्स ज्यांना आपण म्हणू शकतो असे महात्मा ज्योतिबा फुले यांना स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या वतीने वडवणी येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव लहू खारगे, जिल्हा कमिटी सदस्य शरद कुरकुटे, बालाजी हेंद्रे, मनोज म्हेत्रे, शंकर टिपरे, किरण कुरकुटे, बालाजी कुरकुटे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय