शहापूर : भरमसाठ वीज बिले आणि मीटर बदलून देण्याची मागणीसाठी डीवायएफआयच्या वतीने ११ एप्रिल रोजी शहापूर महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.
वीज बिलाची भरमसाठ रक्कम पाहून ग्राहकांना शॉक लागण्याची वेळ आली आहे. यामुळे ग्राहक आपल्या तक्रारी घेऊन महावितरनाच्या कार्यालयात पोहचत. मीटर बदलून देण्याची मागणी केली जात आहे. परंतु महावितरण मात्र वीज बिलात कुठलाही घोळ नसल्याचा दावा करीत आहेत. ज्याचे वीज बिल १५० रु येत होते त्यांना १५०० ते २००० रु बिल आले आहे, काही कुटुंबाना तर ४३,३७० रु एवढ्या मोठ्या रकमेने आले आहे. यामुळे मीटर मध्ये बिघाड असल्याचा तक्रारी वाढत असल्याने भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI) च्या वतीने शहापूर महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.
काही ठिकाणी नवीन वीज मंजूर होऊन अनेक वर्षे झाली आहेत परंतु त्या ठिकाणी वीज कनेक्शन दिलेलं नाही अशा अनेक प्रश्नांना घेऊन आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व राज्य कमिटी सदस्य प्रकाश चौधरी, जिल्हा सहसचिव भरत वळंबा, तालुका सचिव भास्कर म्हसे, तालुका अध्यक्ष नितीन काकरा, सुनील करपट, बापू वाघात, आनंद रोज, विनोद घाटाळ, महेंद्र पचालकर, प्रमिला घाटाळ, मनोज ककवा, रशीद शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.