Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात काल प्रचाराचा शेवट दिवस होता. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोन्ही उमेवारांनी काल बारामतीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सुप्रिया सुळे यांच्या सभेत रोहित पवार (Rohit Pawar) हे शरद पवारांविषयी बोलताना भावूक झाल्याचे बघायला मिळाले. यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
रोहित पवार यांनी सभेत बोलताना म्हणाले, जोपर्यंत लढण्यासाठी नवी पिढी तयार होत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते, तसेच पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांची स्थिती काय होती हे सांगताना रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या या भाषणाची व्हिडिओ क्लीपही व्हायरल होत आहे. यावर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी रोहित पवारांच्या रडण्याची नक्कल करत जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले Ajit Pawar ?
अजित पवार यांनी त्यांच्या भाषणादरम्यान रोहित पवार यांची नक्कल केली. मी तुम्हाला सांगितलं होतं की, शेवटच्या दिवशी तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न होईल. आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो. अरे मला मतदान द्या, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
अजितदादांच्या या कृतीला रोहित पवार यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडिया एक्स वर लिहले आहे की, अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण #ED ची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यातील अश्रूप्रमाणे माझे मगरीचे नक्राश्रू नाहीत. माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत… आणि त्यासाठी विचार, काळीज, जीवंत मन आणि अंगात माणूसपण असावं लागतं अजितदादा…. आणि हो… वडलांना सोडून जाण्याइतका मी पाषाण हृदयी नाही. असं प्रत्यूत्तर रोहित पवार यांनी दिलं आहे.


हे ही वाचा :
‘तो’ प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर
ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ भागात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के
बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत ‘या’ तारखांना करता येणार पोस्टल मतदान
भाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका
अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप
कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे
ब्रेकिंग : माजी मंत्री एचडी रेवण्णा यांना अटक, एसआयटीची मोठी कारवाई
मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट
ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन