Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

धक्कादायक : टार्गेट पूर्ण न केल्याने कामगारांना कुत्रा बनवले, प्रायव्हेट पार्टला स्पर्श व्हिडिओ व्हायरल

कोची, केरळ : केरळच्या (Kerala) कोची शहरात एका खासगी मार्केटिंग कंपनीत कामगारांवर अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टार्गेट पूर्ण न केल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांना कुत्र्यासारखे वागवण्यात आले असून, यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

---Advertisement---

काय आहे प्रकरण? | Kerala Workers treated like dogs

कोचीतील कालूर परिसरात गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत असलेल्या हिंदुस्तान पॉवर लिंक्स या मार्केटिंग कंपनीत, ज्याला केल्ट्रा मार्केटिंग या नावानेही ओळखले जाते, कर्मचाऱ्यांना टार्गेट पूर्ण न केल्यास क्रूर वागणूक दिली जात असल्याचा आरोप आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसते की, कर्मचाऱ्यांच्या गळ्यात पट्टा बांधून त्यांना कुत्र्यासारखे चालवले गेले. इतकेच नव्हे, तर त्यांना जमिनीवर ठेवलेल्या भांड्यातून पाणी प्यायला लावले गेले, काही कर्मचाऱ्यांना कपडे काढून प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याची संतापजनक घटना समोर आली आहे. (हेही वाचा –माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची भर सभेत थोबाडीत, वाचा सभेत काय घडले)

या व्हिडिओमुळे संतापलेल्या जनतेने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कंपनीविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. केरळचे कामगारमंत्री व्ही. शिवकुट्टी यांनी या घटनेला “धक्कादायक आणि अस्वीकार्य” संबोधत तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. “केरळसारख्या प्रगत राज्यात अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, केरळ राज्य युवा आयोगाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली असून, जिल्हा पोलिस प्रमुखांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा – महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली, वाचा काय आहे प्रकरण !)

---Advertisement---

कंपनीकडून आरोपांचे खंडन

हिंदुस्तान पॉवर लिंक्सच्या व्यवस्थापनाने या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कंपनी सर्व कायदेशीर नियमांचे पालन करते आणि कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा पुरवते.  (हेही वाचा – नाशिकमध्ये पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा, पुरुष आयोगाची केली मागणी)

या घटनेने केरळसह संपूर्ण देशात खळबळ माजवली आहे. कॉर्पोरेट जगतात कर्मचाऱ्यांवर टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चुकीच्या पद्धतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. ही घटना एकट्या कंपनीपुरती मर्यादित आहे की हा व्यापक समस्येचा भाग आहे, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. तसेच, कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याला प्राधान्य देण्यासाठी कायदेशीर संरक्षणाची गरजही अधोरेखित झाली आहे.  (हेही वाचा – धक्कादायक : पुण्यात शरीराचे पाच तुकडे करून खाणीत फेकला मृतदेह)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles