Friday, November 22, 2024
Homeराजकारणकिरीट सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी ८ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल, शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार?

किरीट सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी ८ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल, शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार?

Photo : Kirit Somaiya / Twitter

पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुणे महानगरपालिका परिसरात शिवसैनिकांकडून झटापट झाली. या प्रकरणी आता शिवसेना नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरून शिवसैनिक आक्रमक झाले होते. पुणे महानगरपालिका परिसरात शनिवारी (५ फेब्रुवारी) सोमय्या आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला, त्यावेळी किरीट सोमय्या महानगरपालिकेच्या पायर्यावर पडले त्यात त्यांना ईजा झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या राड्यावरून पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पुण्याचे शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरेंसह शिवसेनेच्या 8 नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच, शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार असल्याचाही दावा किरीट सोमय्या यांनी ट्वीटर वरून केला आहे.

पंजाब : काँग्रेसने जाहिर केला मुख्यमंत्री पदाचा चेहरा, गटबाजी वाढणार ?

खासदार उदयनराजे भोसले यांची पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी होणार, केले “हे” सुचक विधान !

किरीट सोमय्या यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे कि, “मला मारहाण केल्याप्रकरणी पुणे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह 8 शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार आहेत. FIR एफआयआर क्रमांक आयपीसी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४, ३७(१), १३५”

एफआयआरमध्ये संजय मोरे (शिवसेना पुणे शहराध्यक्ष), चंदन साळुंके (पदाधिकारी), किरण साळी, सुरज लोखंडे, आकाश शिंदे, रुपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनि गवते या शिवसेनेच्या ८ स्थानिक नेत्यांच्या नावे आहे.

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

संबंधित लेख

लोकप्रिय