Sunday, May 19, 2024
Homeराजकारणशेतमजुर यूनियनचे तलाठी कार्यालय समोर निदर्शन लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान भरपाई म्हणून...

शेतमजुर यूनियनचे तलाठी कार्यालय समोर निदर्शन लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान भरपाई म्हणून 7500 रुपये मदत करा

माजलगाव : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये लोक डॉन मुळे त्रस्त झालेल्या जनतेला कुठलाही दिलासा दिला नाही. माणसी पाच किलो धान्य व कुटुंबाला एक किलो दाळ याव्यतिरिक्त रोजगार व उत्पन्न बुडालेल्या असंघटित कामगार, नोकरी गमावलेले कामगार, व्यवसाय बुडालेले व्यवसायिक व दुकानदार यांच्यासाठी नरेंद्र मोदींनी कुठलीही आर्थिक मदत देण्याचा निर्णय जाहीर केला नाही. 

केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाउनमुळे त्रस्त असलेल्या श्रमिकांना तात्काळ आर्थिक नुकसान द्यावी या व इतर मागण्यासाठी ३ जुलै शुक्रवार रोजी  महाराष्ट्र राज्य शेतमजूर यूनियन (लाल बावटा)च्या वतीने नित्रुड येथील तलाठी कार्यालय समोर प्रचंड निदर्शन करण्यात आली, लॉकडाउनमुळे नुकसान झालेल्या व टॅक्स न भरणाऱ्या सर्व श्रमिकांना ७ हजार ५०० रुपये प्रति महिना नुकसान भरपाई द्या, सर्व शेतमजूरांना ३५ किलो धान्य मोफत द्या, श्रावणबाळ लाभार्थीना जून २०२० पर्यंतचे अनुदान वाढवा, सर्व शेतकऱ्यांना पिककर्ज विनअट वाटप करा, सन २०२० मधील खरीप हंगामा मधील पिक विमा कँपनी नियक्त करून तात्काळ पिक विमा भरून घ्या, सन २०१९ खरीप हंगाम मधील कापूस, तुर पिकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना विमा तात्काळ जमा करा.

            आदी मागण्याचे निवेदन तलाठी मढ़कर यांना देण्यात आले. निवेदनावर सय्यद रज्जाक, दत्ता डाके, अशोक तातोड़े, सुभाष डाके, पांडुरंग उबाळे, सुखदेव घुले, कांता तेलगड आदींच्या सह्या आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय