Sunday, May 12, 2024
Homeराज्यपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा तृतिय जन्मशताब्दी महोत्सव आणि घाट व बारवांच्या संवर्धनासाठी...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा तृतिय जन्मशताब्दी महोत्सव आणि घाट व बारवांच्या संवर्धनासाठी ७३ कोटी रुपये

खर्डा किल्ल्याच्या संवर्धनासाठीही ७.१८ कोटी रुपये मंजूर

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश

कर्जत/जामखेड (ता.१) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर बांधलेली मंदिरे, घाट आणि बारव यांचे संवर्धन करण्यासाठी ५३ कोटी रुपये, त्यांच्या तृतिय जन्मशताब्दीसाठी २० कोटी रुपये तर खर्ड्याच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या जतन व संवर्धनसाठी ७.१८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याबाबत आमदार रोहित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.

चौंडी (ता. जामखेड) ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी असून येथील विकासासाठी आमदार रोहित पवार यांनी कोट्यवधी रुपयांचा भरीव निधी मंजूर करुन आणला आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी घाट, म्युझियम आणि कमान बांधण्याचे काम सुरु आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात अनेक ठिकाणी मंदिरांचा जिर्णोद्धार केला असून काही ठिकाणी नवीन मंदिरे बांधील आहेत. याशिवाय घाट आणि बारव बांधून नागरिकांच्या पाण्याची सोय केली आहे. हा ऐतिहासिक ठेवा असून तो पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असल्याने त्याचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. विधानसभेतही त्यांनी ही मागणी केली होती. याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर केलेले व्यापक कार्य पाहता त्यांचा तृतिय शताब्दी महोत्सव हा भव्य स्वरुपात साजरा करण्यासाठीही भरीव निधीची मागणी केली होती. या दोन्ही मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्या असून मंदिरं, बारव व घाट यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी ५३ कोटी रुपये तर तृतिय जन्मशताब्दी महोत्सवासाठी २० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

‘‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं समाजासाठी भरीव योगदान असून त्यांनी निर्माण केलेला ऐतिहासिक ठेवा पुढील पिढ्यांना दाखवण्यासाठी त्याचं जतन करणं आवश्यक आहे. तसंच त्यांचा तृतीय जन्मशताब्दी महोत्सवही भव्य स्वरुपात साजरा करण्यासाठी भरीव निधीची मागणी महाविकास आघाडी सरकार आणि सध्याच्या सरकारकडं केली होती. याशिवाय खर्डा किल्ल्याचं जतन व संवर्धन करण्यासाठीही निधीची मागणी केली होती. या मागण्या मान्य करत भरीव निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सरकारचे आभार!’’
- रोहित पवार (आमदार कर्जत-जामखेड)

दरम्यान, मराठ्यांची अखेरची विजयी लढाई झाली त्या खर्डा येथील ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यासमोर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून विश्वविक्रमी उंचीचा भगवा स्वराज्य ध्वज उभारण्यात आला आहे. खर्डा किल्ला आणि हा स्वराज्य ध्वज पाहण्यासाठी राज्यभरातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यांच्या सोयीसाठी आमदार रोहित पवार यांनी या भागात रस्त्यांची कामे मोठ्य प्रमाणात केल आहेत. तसेच वेळोवेळी पाठपुरावा करुन किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठीही निधी मंजूर करुन आणला असून हे काम सध्या सुरु आहे. किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी आता नव्याने पुन्हा ७ कोटी १८ लाख रुपयेही त्यांनी मंजूर करुन आणले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय