Friday, November 22, 2024
Homeराज्यडॉक्टर, नर्सेस व कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने व 50 लाखाचे विमा कवच लागू...

डॉक्टर, नर्सेस व कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने व 50 लाखाचे विमा कवच लागू करण्याची सीटूची मागणी.


नाशिक(२३ मे):- कोरोनामुळे पुण्यातील डॉक्टर संजय शेलार यांचा उपचार घेत असताना दुर्दैवी  मृत्यू  झाला. डॉ. संजय शेलार हे पुण्यातील झोपडपट्टी परिसरात रुग्णसेवा देत होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाजगी दवाखाने व हॉस्पिटलमधील डॉक्टरांना रुग्णसेवा देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले होते. डॉ.संजय शेलार रुग्णसेवा देत असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अशाच दुर्दैवी घटना मालेगाव मध्ये झाल्याची झाल्याचे वृत्त आहे .

       खाजगी क्षेत्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा देताना करोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र  सरकारने सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे विमा कवच लागू केले आहे.

 त्याच धर्तीवर खाजगी दवाखाने व हॉस्पिटलमधील डॉक्टर ,नर्सेस ,पॅरामेडिकल व कर्मचाऱ्यांनाही 50 लाखाचे विमा कवच व सुरक्षा किट देणे आवश्यक  आहे. 

या पार्श्वभूमीवर सिटू कामगार संघटनेच्यावतीने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.

* डॉक्टर संजय शेलार यांच्या कुटुंबियांना 50 लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य केंद्र व राज्य सरकारने द्यावे.

* खाजगी दवाखाने व हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉक्टर ,नर्सेस ,पॅरामेडिकल व कर्मचाऱ्यांना गरजेनुसार सुरक्षा किटचा पुरवठा करावा 

संबंधित लेख

लोकप्रिय