नवी मुंबई : डोंबिवली (घेसरगाव) येथून खाजगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दि. १५ जुलै रोजी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे 5 लाख रुपये मदत देण्याचे आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. (Mumbai)
कळंबोली नवीमुंबई येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देऊन जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. शासन आपल्या पाठीशी असल्याचे रुग्णांना सांगितले. जखमींवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी उपचाराबाबत अधिक माहिती जाणून घेतली. अतीदक्षता विभागात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांना अधिक उपचारासाठी अन्य रुग्णालयात स्थलांतरीत करावे लागल्यास तसे करावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली. (Mumbai)
खाजगी बस आणि ट्रॅक्टर यांच्या मध्ये झालेल्या अपघातात 46 जखमी आहेत. त्यापैकी 7 वारकरी गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी झालेल्या अपघाताची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी : अजित पवारांना मोठा धक्का ; अनेक नेत्यांचा शरद पवार गटात पक्ष प्रवेश
बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव ! मुंबईत 600 लोडर्स पदासाठी तब्बल 25,000 तरूणांची गर्दी
मोठी बातमी : लाडकी बहीण’ योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना, ‘हा’ मिळणार लाभ
केदारनाथमधून तब्बल 228 किलो सोने गायब, शंकराचार्यांनी केला गंभीर आरोप
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर
कृषी महाविद्यालय, सोनापूर अंतर्गत भरती
IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 476 जागांसाठी भरती
मेगा भरती : मध्य रेल्वे अंतर्गत 2424 जागांसाठी भरती