Saturday, May 18, 2024
Homeजिल्हा'चार घास सुखाचे' कम्युनिटी किचनचा रोज घेतात ३ हजार नागरिक लाभ !

‘चार घास सुखाचे’ कम्युनिटी किचनचा रोज घेतात ३ हजार नागरिक लाभ !

बेरोजगार, गरजू कष्टकरी, स्थलांतरित कामगारांना अन्न सेवा

पिंपरी, दि.९ : कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, वर्किंग पीपल्स चॅटर ,  इंडिया महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या कम्युनिटी किचनच्या वतीने रोज सुमारे ३ हजार नागरीकांना मोफत अन्नाचे पाकिटे वाटप करण्यात येत आहे.   

थरमॅक्स चौक चिंचवड येथे अन्न वितरण केंद्र उभारण्यात आले असुन येथून दहा ठिकाणी निगडी, भोसरी, आकुर्डी, चिंचवडगाव, पिंपरी, काळेवाडी, नेहरूनगर, चिखली या परिसरामध्ये मागणीनुसार जेवणाचे डबे रिक्षा द्वारे पोहचले जात असल्याची माहिती कष्टकरी महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांनी दिली. 

यामध्ये राष्ट्रीय किमान वेतन आयोगाचे सदस्य चंदन कुमार, कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष महेश स्वामी उपाध्यक्ष राजेश माने, माध्यम प्रमुख उमेश डोरले, इरफान  चौधरी, धर्मेंद्र पवार, माधुरी जलमुलवार, राणी माने, विजया पाटील, सीमा शिंदे, शंकर साळुंके, सिद्धनाथ देशमुख, संजय कांबळे, निरंजन लोखंडे तुकाराम माने, राजू बोराडे आदी पाच समित्या करून पाच समित्या करून याचे वितरण केले जात आहे. 

कोरोना कालावधीमध्ये अनेक कष्टकरी कामगारांचे हातचे काम गेले अनेक कंत्राटदार निघुन गेले आणि त्यांना पैसे दिले नाहीत अशा परिस्थितीमध्ये कसे जगायचे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पती पत्नी दोघांचे काम  गेल्यामुळे संकट आले आहे.

अशा स्थितीमध्ये कष्टकरी कामगारांना एक दिलासा म्हणून महासंघ तर्फे मिळत आहे. अन्न वितरण  करण्यात येत असून सुमारे महासंघाचे सुमारे ८० कार्यकर्ते या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत आणि दररोज जेवणात योग्य प्रकारे नियोजन केले जात असून या हातचे काम केलेल्या सुमारे वीस कष्टकरी कामगारांना ही या जेवणाच्या उपक्रमामुळे त्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. दररोज विविध  मान्यवरांना बोलावून त्यांच्या हस्ते वितरण केले जात आहे.

यामध्ये महाराष्ट्राचे पार्श्वगायक आनंद शिंदे, माजी  नगरसेवक मारुती भापकर, आशिष शिंदे, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, कवी सुरेश कंक, पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष काळूराम कवितके, संवाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरीश  मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे क्रांतिकुमार कडुलकर, शैलजा कडुलकर यांनी सहभाग नोंदवला असून ५ जुलै पर्यंत अन्न वितरणसेवा सुरू राहणार आहे. त्याही पुढे आवश्यकता भासल्यास महासंघातर्फे प्रयत्न करून हे नियोजन करण्यात येणार आहेत. कष्टकऱ्यांना चार घास सुखाचे या उपक्रमाअंतर्गत लाभ मिळत आहे आणि यामुळे त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद द्विगुणित होत आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय