Friday, May 3, 2024
Homeराज्यब्रेकिंग : मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची धमकी, पाकिस्तानी नंबरवरून मेसेज

ब्रेकिंग : मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची धमकी, पाकिस्तानी नंबरवरून मेसेज

मुंबई : मुंबईमध्ये (Mumbai) पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला (Attack) होणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोल रूमला हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी नंबरवरून 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. ऐन सणासुदीच्या काळातच हा मेसेज आल्यानं मुंबई पोलिसांची चिंता वाढली आहे. या धमकीच्या मेसेजनंतर पोलिसांनी पुन्हा एकदा मुंबईत बंदोबस्त वाढवला आहे.

मेसेज करणाऱ्यानं म्हटलंय की, जर त्याचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, तर ते भारताबाहेरचं दाखवलं जाईल आणि धमाका मुंबईत होईल. भारतात सध्या 6 लोक आहेत, जे हे काम पूर्ण करतील, असंही म्हटलं आहे. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी देखील हाय अलर्ट जारी केला आहे. त्यासोबतच दुसऱ्या तपास यंत्रणांनाही याची माहिती दिली आहे.

दरम्यान, या अगोदर रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर एक संशयास्पद बोट सापडली होती, ज्यामध्ये तीन एके-47 रायफल आणि काडतुसं सापडली होती. नंतर ही बोट ऑस्ट्रेलियन महिलेची असून याचा दहशतवादाशी कोणताही संबंध सापडला नसल्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय