Monday, May 13, 2024
Homeकृषीप्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा भरण्याकरिता जिल्हातील सर्व आपले सरकार...

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा भरण्याकरिता जिल्हातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र 24 तास चालू राहणार – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

(बीड) प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा भरण्याकरिता शासनाकडून विहित दिलेल्या कालावधीत सर्व शेतकऱ्यांना पीक विमा भरता यावा आणि एकही शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र 24 तास चालू ठेवून, पिक विमा भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक शेतकरी यांचा अर्ज भरून घ्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत

       प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यभरात प्रगतीपथावर असून शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याकरिता शासनाकडून दिनांक 31 जुलै 2020 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघता, बऱ्याचशा गावांमध्ये, केंद्रात जास्त गर्दी झाल्यामुळे बरेच शेतकरी हे पीक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

       सर्व शेतकऱ्यांना पीक विमा भरता यावा, यासाठी सकाळी 07.30 ते संध्याकाळी06.30 या वेळे व्यतिरिक्तही चालू ठेवणे अत्यावश्यक आहे सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांचे करिता फक्त या कारणासाठी प्रतिबंधात्मक आदेश शिथिल करून खालील अटी व शर्तीचे पालन करून आपण आपले सरकार सेवा केंद्र सुरू ठेवण्याचे सूचित केले आहे . या नियमाचे उल्लंघन झालेले निदर्शनास आल्यास केंद्रचालक, ऑपरेटर हे शिक्षित पात्र राहतील.

आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी घ्यावयाची खबरदारी

1. आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी केंद्रातील सामग्री/ उपकरणे व परिसराचे निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक आहे.

2. केंद्र चालक यांनी स्वच्छता विषयक सर्व निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे उदा. वारंवार साबणाने हात धुणे,  सॅनिटायझर वापरणे, मास्क वापरणे इ.

3. केंद्रामध्ये काम करताना ऑपरेटर/ चालक यांनी नाक, तोंड व डोळ्यांना स्पर्श होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

4. केंद्रात येणाऱ्या नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे.

5. केंद्र चालक /ऑपरेटर यांचे टेबल व नागरीकांमध्ये शारीरिक अंतर किमान 1 मीटर सुनिश्चित करून गर्दी टाळावी. तसेच रांगा लावताना प्रत्येकामध्ये किमान 6 फूट अंतर राहील, अशा खुणा जमिनीवर करून घ्याव्यात.

6. ज्या नागरिकांना किंवा कर्मचाऱ्यांना खोकला, ताप, कफ अथवा कोरोना सदृश्य लक्षणे असतील, अशा नागरिकांनी केंद्रात न येण्या बाबतचे पत्रक दर्शनी भागात लावावेत.

7. शासनाने निश्‍चित केलेले सेवा वितरण विषयक दर नमूद असलेले फलक दर्शनी भागास लावावेत.

8. केंद्र चालक/ ऑपरेटर यांनी कोरोना प्रतिबंधित/ प्रादुर्भाव झालेल्या भागातून प्रवास टाळावा.

9. प्रतिबंधित क्षेत्र(CONTAINMENT ZONE) मध्ये असलेल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र बंद राहतील व सदरील(CONTAINMENT ZONE) रद्द केल्यावर सुरू करता येतील.

10. कुठल्याही प्रकारची शिबिर आयोजित करू नये.

       ग्रामीण भागातील(CONTAINMENT ZONE) मधील गावांच्या बाबतीत (स्थिती) आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी त्या गावातील शेतकऱ्यांना घरपोच सेवा द्यावी. संबंधित आपले सरकार सेवा केंद्र शेतकऱ्यांना घरपोच सेवा पुरवण्यात येत असल्याबाबतची खात्री संबंधित ग्रामसेवक यांनी करावयाची आहे.

       ग्रामीण भागातील एखादे गाव जर क्षेत्राने /लोकसंख्येने मोठे असेल व त्या गावांमध्ये एकापेक्षा जास्त आपले सरकार सेवा केंद्र असतील तर संबंधित ग्रामसेवक यांनी त्या गावाचे गट करून आपले सरकार सेवा केंद्राची गट निहाय नेमणूक करावयाची आहे.

       तसेच शहरातील कंटेनमेंट झोन CONTAINMENT ZONE मधील शेतकऱ्यांना घरपोच सेवा पुरवण्यात येत असल्याची खात्री करण्यासाठी कृषी सहाय्यक  यांची प्रभाग निहाय नियुक्त करण्यात येत आहे.जिल्हा समन्वयक, आपले सरकार सेवा केंद्र यांनी

जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र शासनामार्फत पीक विमा योजनेच्या शासनाने निश्चित करून दिलेल्या कालावधीमध्ये करायचे आहे

       निश्चित वेळेव्यतिरिक्त ही सर्व आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत ठेवण्यात येणार असल्याने कायदा व सुव्यवस्था बाबत ठेवण्यासाठीे पोलीस विभाग आणि  प्रधानमंत्री पिक विमा योजना अंमलबजावणीबाबत  दैनंदिन आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांच्या मार्फत घेण्यासाठी आदेश दिले आहेत

       राज्यभरात सुरू असलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता, जिल्ह्यात सकाळी 07.30 ते संध्याकाळी 06.30 या वेळेतच जीवनावश्यक वस्तूंच्या सर्व आस्थापना चालू ठेवणेबाबत मुभा देण्यात आलेली आहे.जिल्ह्यात दिनांक 31 जुलै 2020 रोजीच्या रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1) (3) लागू करण्यात आले आहेत. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहणार आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय