Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडराजगुरूनगर येथे रक्तदान शिबिरामध्ये २२६ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान

राजगुरूनगर येथे रक्तदान शिबिरामध्ये २२६ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान

आळंदी / अर्जुन मेदनकर : सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील राजगुरूनगर ब्रांच अंतर्गत संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन ८ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये २२६ जणांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले,ज्यामध्ये निरंकारी भक्तांबरोबर समाजातील अनेक सज्जनांनी सहभाग घेतला. वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी यांनी १६८ युनिट तर औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी ५८ रक्त संकलन केले. 226 Nirankari devotees donated blood in blood donation camp at Rajgurunagar

या शिबिराचे उदघाटन अंगद जाधव, अतुल देशमुख (भा.ज.पा. जिल्हा अध्यक्ष), चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, ज्याचे उदघाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी केले होते आणि ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील ३६ वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत १३ लाखाहून अधिक युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.

संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.

गेल्या १५ दिवसांपासून मिशनच्या सेवादारांनी राजगुरूनगर परिसरामध्ये रक्तदानाची जनजागृती करण्यात आली, रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवादल संचालक नरेंद्र रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सेवादल, मिशनचे अनुयायी यांचे योगदान लाभले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार राजगुरूनगर ब्रांच प्रमुख बाळासाहेब जाधव यांनी मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय