Friday, November 22, 2024
Homeराज्यकोविडसंदर्भात राज्यात २ लाख २० हजार गुन्हे दाखल; ३२ हजार पेक्षा अधिक...

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख २० हजार गुन्हे दाखल; ३२ हजार पेक्षा अधिक व्यक्तींना अटक

मुंबई  : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख २० हजार २५६ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३२ हजार ४६७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच १८ कोटी ३६ लाख ३९ हजार ४ रु. दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २ ऑगस्ट या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ८८ हजार ५२५ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३२४ घडल्या असून ८८३ व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. तसेच १०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०९ हजार ११४ आहेत.

राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८२४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार ३४६ वाहनांवर दाखल गुन्हे करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना १०४ पोलीस मृत्युमुखी पडलेले असून कोरोना बाधित पोलीस अधिकारी २२० आहेत तर १ हजार ६७१ पोलीस कर्मचारी बाधित आहेत. 

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय