Tuesday, January 21, 2025

वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत, पतीला नोकरी

मुख्यमंत्र्यांकडून ढुमणे कुटुंबीयांचे सांत्वन

मुंबई, दि. २१ : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. श्रीमती स्वाती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्यासह त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक श्रीमती ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियाप्रति संवेदना प्रकट केली आहे. वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच श्रीमती ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामवून घेण्याचेही निर्देशित केले आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles