Monday, May 20, 2024
Homeग्रामीणसांगली जिल्ह्यातील वारणा धरणात १३.४० टी.एम.सी. पाणीसाठा.

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात १३.४० टी.एम.सी. पाणीसाठा.

सांगली (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत १३.४० टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

        आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये ३४.३७ टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टी.एम.सी, धोम धरणात ५.६० टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता १३.५० टी.एम.सी, कन्हेर धरणात २.२९ टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता १०.१० टी.एम.सी., उरमोडी धरणात ५.७१ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता ९.९७ टी.एम.सी, तारळी धरणात २.१९ टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता ५.८५ टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात ९.२१ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता २५.४० व राधानगरी धरणात २.३३ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता ८.३६ टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात ४४.८९ टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता १२३ टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे. 

 सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडलेला विसर्ग क्युसेक्स मध्ये पुढीलप्रमाणे. वारणा १०००, कोयना २१००, कण्हेर १००, दूधगंगा ६२५, राधानगरी १९०८, उरमोडी ८००, तारळी ३७०, अलमट्टी ५३०. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची  आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड ८.५ (४५),  आयर्विन पूल सांगली १०.३ (४०) व अंकली पूल हरिपूर १४.५ (४५.११).

              धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून पडलेला पाऊस मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. कोयना ३४ (६६१), धोम ०.०० (१७१), कण्हेर १ (१४७), वारणा ४ (४३४), दूधगंगा १८ (७६६), राधानगरी ४९ (८६४), उरमोडी १ (२६२), तारळी ७ (२७०).

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय