मुख्यमंत्री, कामगारमंत्री, सचिवांकडे यांचेकडे केली मागणी.
पिंपरी चिंचवड/,क्रांतिकुमार कडुलकर:दि.१७ – राजगुरुनगर मध्ये जुने जीर्णघर पाडत असताना सुरक्षेची काळजी न घेतल्याने कालच सुनील पांचाळ,विजय वाडेकर या दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत द्यावी व अशा घटना रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात,तसेच घर मालकावर सदस्य मनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री, कामगार मंत्री,कामगार सचिव यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की राजगुरुनगर तालुका खेड, जिल्हा पुणे या शहरातील आजाद चौकात जुने घर पाडत असताना ते कोसळून दि.१६ एप्रिल २०२३ रोजी सुनील पांचाळ व विजय वाडेकर या दोन कामगारांचा मृत्यू झाला यावेळी सुरक्षा बाबत उपाययोजना केली झाली नाही म्हणून या घरमालकावरती गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. या घटनेसह महाराष्ट्र मध्ये दररोज कष्टकरी कामगार हे सुरक्षेअभावी आपला जीव धोक्यात घालून काम करत असतात व अशा दुर्घटना घडत असतात हे टाळण्यासाठी योग्य ती सुरक्षेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
सदरचे कौलारू घर हे १०० वर्षांपूर्वीचे होते अत्यंत जिर्ण झालेले होते ते पाडत असताना कामगाराला धोका होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असताना देखील काळजी घेतली नाही घराची भिंत पाडत असताना त्यांच्यावर लाकडी मोठी तुळई व भिंतीचा भाग काही भाग कोसळला आणि त्याखाली ते अडकल्यामुळे त्यांचे मृत्यू झाले या मृत्यूला मालकास जबाबदार धरून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच सदर मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य देण्यात यावे.अशी मागणी नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन व कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले आहे.