Pune : मॅट्रिमोनी वेबसाइटवरून ओळख वाढवून फसवणुकीच्या घटनांमध्ये भर टाकणारी एक धक्कादायक घटना पुण्यात उघड झाली आहे. पल्लवी पोपट फडतरे (वय २५), या डॉक्टर तरुणीने मानसिक धक्क्यातून आत्महत्या केली आहे. ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या मॅट्रिमोनी वेबसाइटवरून संपर्क साधणाऱ्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याकडून १० लाख रुपये उकळले आणि नंतर लग्नास नकार दिला.
आरोपी कुलदीप आदिनाथ सावंत याने मॅट्रिमोनी वेबसाइटवर स्वतःला अविवाहित असल्याचे भासवत डॉक्टर तरुणीशी ओळख वाढवली. काही दिवसांनंतर लग्नाचे वचन देत त्याने तिचा विश्वास जिंकला आणि तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. परंतु, पैसे उकळल्यानंतर त्याने आपले पहिले लग्न झाल्याचे आणि पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले.
मानसिक धक्क्यातून केली आत्महत्या
कुलदीप सावंतकडून फसवणूक झाल्याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने पल्लवी फडतरे यांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये विषारी औषध घेत आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी कुलदीप सावंत विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीजवळील लॅपटॉप आणि इतर उपकरणे जप्त केली आहेत. पुढील तपास सुरू आहे.
सध्या मॅट्रिमोनी वेबसाइट्स किंवा ऑनलाइन डेटिंग अॅप्सवरून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. खोटी ओळख, लग्नाचे खोटे वचन, आणि पैशांसाठी लोकांची दिशाभूल करणे असे प्रकार वारंवार समोर येत आहेत. (Pune)
मॅट्रिमोनी वेबसाइट्सवर ओळख वाढवताना सावधान (Pune)
या घटनेने मॅट्रिमोनी वेबसाइट्सवर ओळख वाढवताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अनोळखी व्यक्तींवर चटकन विश्वास ठेवणे महागात पडू शकते. मॅट्रिमोनी वेबसाइट्स किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर त्वरित विश्वास ठेवू नये आणि आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहावे,
अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना होणे आवश्यक आहे.
हे ही वाचा :
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, १५ हजार शिक्षकांची होणार भरती
महाराष्ट्रावर कर्जाच्या बोजा, सरकारच्या तिजोरीवर ₹ 96,000 कोटींचा भार
स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित
LIC कडे ₹880 कोटींची दावा न केलेली रक्कम; तुमची रक्कम असू शकते का?
पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचा शिरकाव, वाचा काय आहे नेमका आजार
जिओचा ग्राहकांना मोठा दणका, ‘हा’ प्लॅन 100 रूपयाने महागणार
धक्कादायक : ज्योतिबा डोंगरावर प्रसादात आढळला ब्लेडचा तुकडा, भाविकांच्या जीवाशी खेळ!