Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडअक्षय भालेराव च्या कुटुंबियास माकपची 1 लाख रुपयांची मदत

अक्षय भालेराव च्या कुटुंबियास माकपची 1 लाख रुपयांची मदत

नांदेड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जातीय द्वेषातून निर्घृण हत्या झालेल्या अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना तातडीची एक लाख रुपयांची मदत दि.६ जून रोजी बोंढार येथे जाऊन देण्यात आली.

माकपचे राज्य सचिव प्रा.उदय नारकर यांच्या हस्ते अक्षय ची आई वंदनाबाई श्रावण भालेराव यांना एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी पक्षाचे राज्य सचिव मंडळ सभासद कॉ. विजय गाभणे, कॉ. सुधाकर शिंदे, कॉ संजय मोरे, कॉ.उज्वला पडलवार, कॉ गंगाधर गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.मिना आरसे, कॉ. जयराज गायकवाड, कॉ. सुभाषचंद्र गजभारे कॉ.अफसर शेख, कॉ.पवन जगदमवार आदींची उपस्थिती होती.

या घटनेतील आरोपींची बेलवर सुटका झाल्यास फिर्यादी च्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे आरोपींची बेल होणार नाही आणि आरोपींना भारतीय संविधानातील तरतुदी नुसार कठोर शिक्षा व्हावी असीही मागणी करण्यात येत आहे.

या गुन्हेगारी कृत्यामुळे बोंढार हवेली गावातील व एकूण मराठवाड्यातील सामाजिक वातावरण दूषित होऊ शकते. त्यातून आणखी अनर्थ होऊ नये यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे.गावातील सर्व जातींमधील जनतेला सोबत घेत गावात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.तसेच सामाजिक सलोखा टिकवीला पाहिजे असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय