Home आंतरराष्ट्रीय Russia : रशियात फिरायला गेलेल्या तरुणांना जबरदस्तीने रशिया-युक्रेन युद्धात पाठवले

Russia : रशियात फिरायला गेलेल्या तरुणांना जबरदस्तीने रशिया-युक्रेन युद्धात पाठवले

Russia: Young people who went for a walk in Russia were forcibly sent to Russia-Ukraine war

Russia : पंजाब आणि हरियाणातील 7 तरुणांची रशियात फसवणूक झाली आहे. रशियात (Russia) पर्यटनासाठी गेलेल्या तरुणांना रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine war) लढण्यास जबरदस्तीने पाठवण्यात आले आहे. या तरुणांच्या एका गटाने भारत सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. Young people who went for a walk in Russia were forcibly sent to the Russia-Ukraine war

NDTV या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब आणि हरियाणातील 7 तरुण रशियात पर्यटनासाठी गेले होते. 27 डिसेंबर रोजी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी ते रशियाला गेले होते. त्यांना 90 दिवसांचा वैध व्हिसा मिळालेला होता.

मात्र एजंट त्यांना बेलारूसला घेऊन गेला. बेलारूसला जाण्यासाठी व्हिसा लागेल हे माहीत नव्हते, असे या मुलांचे म्हणणे आहे. व्हिसाशिवाय ते बेलारूसला पोहोचताच एजंटने त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यांना तिथेच सोडले. यानंतर पोलिसांनी त्यांना पकडून अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.

फसवणूकीनंतर या तरूणांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आपली फसवणूक झाल्याचे सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये लष्कराचे कपडे घातलेली सात मुले बंद खोलीत दिसत आहेत. यातील हर्ष नावाचा मुलगा हरयाणातील कर्नाल येथील रहिवासी आहे. या तरुणांनी भारत सरकारकडे मदतीसाठी आवाहन केले आहे.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : सीएनजीच्या दरात मोठी कपात, सर्वसामान्यांना दिलासादायक

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले.

ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध १८६५ तक्रारी प्राप्त; ७३९ परवाने निलंबित, वाचा काय प्रकरण

Facebook, Instagram down : फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन; वापरकर्ते हैरान

सर्वात मोठी भरती : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया आजपासून सुरू

शेतकऱ्यांनी सरकारकडे काही मागायचे नाही, तर… नाना पाटेकर यांचे मोठे विधान

मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना नियुक्त्या प्रदान

Exit mobile version