Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणतुम्ही सभ्य संस्कृतीचा अपमान केला आहे, माफी मागा - माकप

तुम्ही सभ्य संस्कृतीचा अपमान केला आहे, माफी मागा – माकप

पिंपरी चिंचवड : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला चीन आणि पाकिस्तान मधून रसद पुरवली जाते. दिल्लीतील आंदोलनासाठी 300 रुपये भाड्याने माणसे आणली जातात, असा असभ्य आणि असंस्कृत आरोप  उपमहापौर केशव घोळवे यांनी महापालिका सभेत करून शेतकरी आंदोलनाची गंभीर चेष्टा केली आहे. तुम्ही सभ्य संस्कृतीचा अपमान केला आहे, शेतकऱ्यांची माफी मागा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालयीन सचिव क्रांतिकुमार कडूलकर यांनी केली आहे. 

 

ते म्हणाले, स्वतः उपमहापौर हे ऊसतोड कामगारांचे पुत्र आहेत, शहराचे ते सन्माननीय नागरिक आहेत. रामकृष्णाच्या संस्कृतीचा अहोरात्र जप करणाऱ्या त्यांच्या राजकीय विचारसरणीचा त्यांनी स्वतःच्या वक्तव्याने पराभव केला आहे. कलियुगातील या राम भक्तांनी अभंग गाथा आणि ज्ञानेश्वरीचे पारायण करावे.

साहेब तुम्ही शेतकरी आंदोलनाचा अपमान करून वाचाळ संस्कृतीचे प्रदर्शन केले आहे, आपण जाहीर माफी मागून शेतकरी आंदोलनाचे समर्थन करावे, अशी मागणी केली आहे. तसेच सभागृहातील या वक्तव्याचा माकपने निषेध केला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय