Wednesday, May 1, 2024
HomeNewsमोफत प्रशिक्षणाद्वारे महिलांनी सक्षम व्हावे-प्रा.वैशाली गायकवाड

मोफत प्रशिक्षणाद्वारे महिलांनी सक्षम व्हावे-प्रा.वैशाली गायकवाड

‘विपला फाउंडेशन’ तर्फे त्रिवेणी नगर मध्ये कम्युनिटी सभेचे आयोजन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
:पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील गरजू महिलांसाठी विपला फाउंडेशन ही संस्था गेली काही वर्षे विविध कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे सक्षमीकरण करत आहे.संस्थेच्या महिला प्रशिक्षण केंद्र,पिंपरी – चिंचवड च्या प्रा.वैशाली गायकवाड,Placement Co-Ordinator प्रा.दीपक जाधव यांनी त्रिवेणी नगर येथे सुशिक्षित गरजू महिलांची सभा आयोजित केली होती.

गरजू आणि गरीब महिलांना विपला फाउंडेशन मध्ये होणारे वेगवेगळे कोर्सेस आणि त्याचे फायदे याविषयी माहिती देताना प्रा.वैशाली गायकवाड म्हणाल्या की,सुशिक्षित किमान दहावी उत्तीर्ण,पदवीधर महिलासाठी लॅपटॉप,अँड्रॉइड मोबाईल,संगणक आधारित बिलिंग,अकौंटिंग,रिटेल,कॉलिंग,मार्केटिंग ईई विशिष्ट प्रकारच्या जॉबसाठी मोफत सॉफ्ट स्किलचे कोर्सेस आम्ही देतो.पारंपरिक कष्टाच्या कामात महिलांना मोबदला कमी मिळतो.आताच्या कॉमर्सच्या व्यवहारातील प्रशिक्षण पूर्ण केल्यावर किमान मासिक उत्पन्नाच्या नोकऱ्या संस्था मिळवून देते.महिलांनी आमच्या मोफत प्रशिक्षण केंद्राचा लाभ घ्यावा.

या कार्यक्रमाचे उदघाटन करताना संस्थेचे प्लेसमेंट को-ऑर्डीनेटर प्रा.दीपक जाधव यांनी केले,ते म्हणाले की,कोरोना महामारीच्या काळात कुटुंब उध्वस्त झाली. गेल्या अनेक वर्षापासून संस्थेने गरजू महिला मुलींसाठी सॉफ्ट स्किल प्रशिक्षण केंद्र पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे सुरू केले.मोबाईल सहज हाताळणाऱ्या महिला मुलींना संगणक प्रशिक्षण घेणे अतिशय सोपे असते.आम्ही 3000 हुन जास्त महिला मुलींना प्रशिक्षण दिले.त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.त्या संसाराला हातभार लावत आहेत.अनेक महिला आपली स्वतःची कुटुंब व्यवस्थितपणे चालवत आहेत. ज्या महिला अगोदर धुणीभांडी करत होत्या.त्या महिलांच्या हातामध्ये आता कम्प्युटर आले आहेत. अशा अनेक महिला ऑफिसमध्ये बसून सध्या काम करत आहेत.

तसेच बँकिंग-फायनान्शियल सर्व्हिसेस-इन्शुरन्स(BFSI),
बीपीओ या कोर्स बद्दल देखील माहिती देण्यात आली.
यावेळी वुई टूगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम सय्यद यांच्या हस्ते उपस्थित महिलांना खाऊ वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरला उपरवट यांनी केले.
यावेळी शीला शिंदे,ज्योती शेंडगे आणि कुरणे मॅडम तसेच उपरवट सर पार्थ कलाल कौस्तुभ जाधव उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय