Sunday, June 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आपल्याला का वाजते थंडी?

Photo : Pexels

नवी दिल्ली : थंडी ही सर्वात आधी त्वचेला जाणवते. त्यामुळेच अंगावर रोमांच उभे राहतात आणि अनेक वेळा बोटंही सुन्न होतात. ज्यावेळी तापमान घटते त्यावेळी शरीराचे पहिले सुरक्षा आवरण म्हणजेच त्वचेला त्याची जाणीव होते. त्वचेच्या खालीच असलेल्या थर्मो-रिसेप्टर नर्व्स मेंदूला लहरींच्या रूपात याबाबतचा संदेश पाठवतात की थंडी वाजत आहे! वेगवेगळ्या लोकांसाठी तिचा स्तर आणि तीव्रता वेगवेगळी असू शकते.

---Advertisement---

त्वचेमधून जाणार्‍या लहरी मेंदूच्या हायपोथॅलॅमसमध्ये पोहोचतात. हायपोथॅलॅमस शरीराच्या आंतरिक तापमान आणि पर्यावरणाचे संतुलन ठेवते. हे संतुलन बनवण्याच्या प्रक्रियेतच अंगावर काटा येणे, स्नायू आखडणे या क्रिया घडतात. हायपोथॅलॅमस शरीराच्या चेतासंस्थेला संदेश देते, कारण आपले शरीर तापमान अधिक कमी होणे सहन करू शकत नाही. जर तापमान खूपच खाली गेले तर शरीराचे अनेक अवयव काम करणे बंद करतात. मल्टी ऑर्गन फेल्युअर झाल्याने माणसाचा मृत्यूही होऊ शकतो.

---Advertisement---

अधिक थंडीमुळे निर्माण होणारी ‘हायपोथर्मिया’ची स्थिती प्राणघातक ठरू शकते. आपल्या त्वचेवर थंडीची जाणीव झाली तरी मेंदू शरीराच्या आतील तापमान घटण्यापासून रोखते. मेंदू संपूर्ण शरीराला इशारा देतो की तापमान घटत आहे आणि आपल्याला तापमान संतुलित करायचे आहे. त्यामुळे सर्व अवयव, स्नायू आपल्या कामाची गती धीमी करतात. धीम्या गतीने काम करणार्‍या अवयवांपासून अधिक मेटाबॉलिक हिट निर्माण होते. त्यामुळे शरीरात अचानक हुडहुडी भरते. त्याचा अर्थ आपले शरीर बाह्य तापमानाच्या तुलनेत आतील तापमानाला संतुलित करीत आहे. एखाद्या व्यक्तीला किती थंडी वाजेल हे तिच्या लिंग, वय आणि जनुकांवरही अवलंबून असते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles