Wednesday, June 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभक्ती शक्ती समुहशिल्पा जवळ सार्वजनिक शौचालय व जेष्ठांना आसन व्यवस्था करा -...

भक्ती शक्ती समुहशिल्पा जवळ सार्वजनिक शौचालय व जेष्ठांना आसन व्यवस्था करा – बारा बलुतेदार महासंघाची मागणी

पिंपरी चिंचवड : भक्ती शक्ती समुहशिल्पा जवळ सार्वजनिक शौचालय व जेष्ठांना आसन व्यवस्था करा, अशी मागणी बारा बलुतेदार महासंघाने महापौर माई ढोरे, मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या  निगडी येथील भक्ती शक्ती समूह शिल्प येथे अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झालेली पहावयास मिळाली. काही ठिकाणी फरशीच्या जॉईंट मधील सिमेंट निघालेले तर काही फरश्या निम्म्या तुटलेल्या अवस्थेत दिसल्या. पर्यटक विशेष म्हणजे महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक येत असतात, त्यांच्यासाठी शौचालय / मुतारी याची सोय नाही. 

पिंपरी चिंचवड येथील वुई टूगेदर संस्थेतर्फे मावळमध्ये किराणा वितरण

10 वी व 12 साठी सुवर्णसंधीचा लाभ घ्या! नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या १७७ जागा

तसेच आजूबाजूच्या परिसरात सार्वजनिक स्वछतागृहाची दुरुस्ती आणि अतिरिक्त स्वछतागृहांची गरज आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी बारा बलुतेदार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष विशाल जाधव, जिल्हाध्यक्ष सोमनाथ शेळके हे उपस्थित होते. निवेदनावर पिंपरी चिंचवड सचिव संतोष कुमावत, संध्या कुमावत, गणेश ढाकणे यांच्या सह्या आहेत.

 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय