Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे काम प्रगतीपथावर

PCMC : महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे काम प्रगतीपथावर

मुदतीमध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिंचवड येथील महानगरपालिकेच्या आरक्षण क्र.१८१ ड या जागेवर नविन प्रशासकिय इमारत बांधणेचे काम करणेत येत आहे. या इमारतीच्या भूखंडाचे क्षेत्र – ८.६५ एकर (३७२३२.२५ चौ.मी.) एकूण बांधकाम क्षेत्र – ९१४५९ चौ.मी. (सुमारे १० लाख चौ. फूट) आहे. नविन प्रशासकीय इमारतीमध्ये पुढील प्रमाणे ४ विंग बांधणेत येणार आहेत. pcmc

A विंग :- ३ तळघर + तळमजला + ६ मजले

B विंग :- ३ तळघर + तळमजला + १८ मजले

C विंग :- ३ तळघर + तळमजला + १८ मजले

D विंग :- ३ तळघर + तळमजला ६ मजले

तसेच सदर इमारतीमध्ये महापालिका सर्वसाधारण सभागृह, सुसज्ज असे ग्रंथालय, प्रदर्शन दालन, बहु उद्देशीय सभागृह, नागरिक व कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी साठी क्लिनिक, ए टी एम सेंटर, इ-गव्हर्नन्स, नागरी सुविधा केंद्र, सुरक्षा कक्ष, कोर्टयार्ड, स्वच्छतागृह, स्वागत आणि माहिती कक्ष, कॅन्टीन व पत्रकार बांधवासाठी पत्रकार कक्ष इ. बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. pcmc

सदर इमारतीची रचना पर्यावरणपूरक (Eco-friendly Building) असून त्यामध्ये जलपुनर्भरण, सौर उर्जेचा वापर, पाण्याचा पुर्नवापर (Climate Responsive Gl fins, Natural Ventilation, Green areas) स्कायलाइट, दोन व चार चाकी मिळून सुमारे ५ हजार वाहने पार्किंग इ. बाबींचा समावेश करणेत आलेला आहे.

इमारतीची उंची ८३ मी. एवढी आहे. इमारत पुर्ण झाल्यानंतर नागरीकांना महानगरपालिकेची सर्व विभागाची कार्यालये एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून महानगरपालिकेच्या कामाकाजात सुसुत्रता येणार आहे. pcmc

कामाचा आदेश जानेवारी २०२३ मध्ये देण्यात आले असून कामाची मुदत ३६ महिने अशी आहे.
स्वीकृत निविदा र.रू.२८६.६३ कोटी इतकी आहे. में के. एम. व्ही. प्रोजेक्ट्स हे ठेकेदार असून सुनिल पाटिल असोसिएट प्रा.ली.हे कामाचे सल्लागार आहेत. pcmc news

“सद्यस्थितीत २०% काम पूर्ण झाले असुन इमारतीचे संपुर्ण खोदकाम व फाऊंडेशनचे काम पुर्ण झालेले असून आता सर्वात खालील तळघराच्या स्लॅबचे काम प्रगतीपथावर आहे. स्लॅब वरील कॉलमचे काम पावसाळ्यात करणे शक्य होणार आहे. मुदतीमध्ये काम पूर्ण करणेचे नियोजन आहे.

-प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता प्रकल्प विभाग

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा

CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !

NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

बँक नोट पेपर मिल अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

IAF : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय