Photo : Pixabay |
जेव्हा जेव्हा मी माझ्या पुढ्यात माझ्या स्वप्नांना, विचारांना बसवतो तेव्हा तेव्हा मला माझी लेखणी डोळ्यासमोर येते आणि मुकी स्वप्ने, स्तब्ध विचार अगदी समुद्रात लाटांनंतर लाटा उसळाव्या तसं माझी मलाच ती बोलू लागतात आणि टेडीबिअरच्या देण्याघेण्याच्या जगापासून दूर ठेवत म्हणतात की अरे प्रेमासारख्या अतिसुंदर भावनेला हातातलं बाहुलं, खेळणं बनवलंय आजकालच्या विक्षिप्त, लिंगपिसाट नजरांनी आणि दृष्टीकोनांनी… काही तरी द्यावं, 7 दिवसांचा हा खेळ रंगवावा, हौस भागवावी आणि पुन्हा नवा खेळ, नवा भिडू अशी सर्व हलकट आणि दूषित मानसिकता तरुण-तरुणींमध्ये पसरत चाललीये हल्ली…
ना ते प्रेम असतं, ना विश्वास असतो, ना काळजी, जिव्हाळा काहीही नाही, फक्त एकत्र येणं याला सर्वस्व समजणाऱ्यांनी स्वतःचा स्वार्थ, मोह, वासना हे साध्य करण्याच्या हेतूने सुंदर, निरागस, निर्मळ, नितळ अशा प्रेमभावनेला कलंकित करून टाकलंय.. याने विचारावं आणि तिने हो म्हणावं…म्हणजे नेमकं कशासाठी तिने हो म्हणावं आणि याने नेमकं कशासाठी तिला विचारावं हा मलाही व माझ्यासारख्या पारदर्शक, तटस्थ विचाराच्या प्रत्येकालाच पडला असेल. प्रेम ही स्पर्शाची नव्हे, भोगायची नव्हे तर जगण्यातली अत्यंत गोड, सुखद, उबदायक, शितल भावना आहे, एक तेज आहे, निरागसता आहे… पवित्रता आहे…
प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी
प्रेम म्हणजे काही व्यवहार नाही, तिचा व त्याचा ठरलेला असा percentage असायला..किंवा त्याचा व तिचा ठरलेला नफा आणि तोटा ठरलेला… प्रेम हे कोणत्याही दोन व्यक्तीमधील एकमेकांप्रती 100% देणं आहे… त्यात अपेक्षा आहेत, कुरबुरी आहेत, गुण आहेत, दोष आहेत, राग आहे, जीव आहे, एकाच प्रकारच्या भावनेने होतो तो व्यवहार आणि सर्वस्पर्शी होतं ते प्रेम.. गुणदोषांसोबत होतं ते प्रेम.. तो किंवा ती दिसायला सुंदर आहे, चांगला आहे.. तिची फिगर well maintained आहे, त्याचे muscles streched आहेत height body ला म्हणावा तसं handsome आहे वैगरे वर फिदा होऊन आयुष्याची नासाडी करवून घेणारी मुलं मुली काही कमी नाहीत…
विशेष लेख : नथुराम जगासमोर आणा पण खरा… – चंद्रकांत झटाले
प्रत्येकाची एक स्वप्न परी असेलही आणि नक्कीच असावीही.. प्रत्येकीचा राजकुमार असतो एका साच्यातील आणि असावाही..पण त्याचे मूल्यमापन आपण नुसत्या दिसण्याने, हसण्याने, चालीने करणार आहोत का..आपला पार्टनर आपली ध्येय जपणारा नको, आपल्यासहीत आपल्या माणसांना जीव लावणारा नको (कारण माणूस एकटा कधीच नसतो), आपल्या शरीरावर प्रेम करण्यापेक्षा आपल्या मनाला जपणारा नको, आपल्याला एखाद्या जनावऱ्या प्रमाणे भक्षाला ओरबाडून खायला बघावं तशा विक्षिप्त विचारांचा सोबती कोणत्या तर्हेने आपला होईल ?
Mister Mummy : रितेश देशमुख प्रेग्नंट?, ‘मिस्टर मम्मी’चे पोस्टर रिलीज!
जगण्याला फक्त दिसणं नाही तर असण्याला जास्त महत्व आहे… कारण जो फक्त दिसण्यात आहे तो जास्त काळ तसाच दिसु शकत नाही… पण जो असण्यातला माणूस हा मरेस्तोवर तसाच असतो… त्याचं सारं काही तो गमावेल, सारं काही तो बदलेल पण आपल्या सहचारीनेवरचे/सोबत्यावरचे प्रेम मात्र वृंधिगतच होईल..आपला पार्टनर हा नुसत्या IQ (intelligence quotient) वरून न पाहता त्याचा EQ(emotional quotient/भावनिक बुध्यांक) आणि SQ (Social quotient/सामाजिक बुध्यांक) हा जगण्यातला आणि तुम्हाला सोबतीने जगवण्यातला खरा गाभा आहे.
सैराट’ फेम आर्चीला रिअल ‘परशा’ मिळाला ? डिनर डेटने रंगली चांगलीच चर्चा !
अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात मिळावी यासाठी आपण कोणासाठीतरी स्वतः ला असं घडवावं मग आपोआपच आपल्या मनाची स्वप्नपरी व राजकुमार पेक्षा ही जो उजवा ठरेल, जो वास्तवातला असेल आणि तुमचं अस्तित्वाचं महत्व जपेल असा पार्टनर मिळेल त्यासाठी हवा संयम, स्वतःला सिद्ध आणि उत्तम माणूस म्हणून घडवण्याची धडपड, स्व-सुधार करण्याची मानसिक, बौद्धिक, शारीरिक तयारी, सूक्ष्मतेकडून सुलभतेकडे जाण्याची वाट कंठण्याची जाणीव आणि आणि वास्तवाचे पूर्णतः चटके सोसण्याची तयारी… कारण हिरा कधीही वातानुकूलित स्थितीत बनत नाही आणि उत्तमतेचं शिखर मऊवाटेवरून पार करता येत नाही…
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती
जो त्याच्या स्वप्नाशी बांधील असेल, conscious असेल व consciously behave करत असेल तोच तुम्हाला आपलं म्हटल्यानंतर जीवापाड जपणार हेही तेवढंच खरं…बाकी आपण हा लेख पूर्ण वाचलात म्हणजे माझ्यापेक्षा आपण नक्कीच सुज्ञ आहात.. ठरवाल का मग कसा हवा आपला जोडीदार ते..??
– विशाल आडे
– MPSC अभ्यासक व मार्गदर्शक
– मु.पो.तोटंबा ता. किनवट जि. नांदेड