Amol kolhe : लोकशाहीची मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी चौथ्या खांबाची भूमिका मोलाची असून सद्य परिस्थितीत पत्रकारांनी अधिक सजग होण्याची खरी गरज आहे. सर्वसामान्यांची बातमी म्हणजे वर्तमानपत्र ही वर्तमानपत्राची ओळख असायला हवी. उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळू नये असं म्हटलं जातं ते मतदानाच्या बाबतीतही होतं. मात्र, आता मतदान करताना भविष्याचा ही विचार करायला हवा, हा खरच अमृत काळ आहे का? याचे आत्मपरीक्षण करायला हवे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी चिंचवड येथे केले.
पुणे येथे शनिवार दिनांक १६ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप झाला. यावेळी अमोल कोल्हे बोलत होते. प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दोन सत्रात झालेल्या अधिवेशन समारोपला माजी मंत्री, आमदार बच्चूभाऊ कडू, आमदार महेश लांडगे, आदी मान्यवरांची उपस्थिती झाला.
उद्घाटन सकाळी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, ज्येष्ठ लेखक अरविंद जगताप, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, महेश म्हात्रे, मंदार फणसे, आशिष जाधव, प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वास आरोटे, उपाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पराग कुंकुलोळ यांच्या उपस्थितीत झाले.
पत्रकारांनी बरं नव्हे तर खरं लिहिले पाहिजे असे सांगुन पत्रकार कोणत्याही पक्ष विचारांचा नसतो तो फक्त बातमीचा असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी अध्यक्षीय समारोपात केले.
समारोप सत्रात कामगारांचे लढवय्ये नेते तथा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, भोसरी मतदार संघाचे आमदार महेश लांडगे, शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, आ.उमा खापरे, राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, चेतन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
बाबा आढाव म्हणाले, पत्रकारांच्या जीवनामध्ये नेहमीच संघर्ष व लेखणीतून लढाया असतात. राज्यातील सर्व पत्रकार एका ठिकाणी पाहण्याचा हा पहिलाच योग असावा. पत्रकार हा समाजातील विविध प्रकारच्या समस्यांची नाडी जाणणारा डॉक्टरच असतो. त्यामुळे त्याने निर्भयपणे उत्तम लिखाण मांडावे. जेणेकरून सामाजिक हित जपण्यासाठी मदत होईल.
यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर म्हणाले, पत्रकारितेच्या क्षेत्रात ‘एआय’ चा शिरकाव पत्रकारांच्या बेरोजगारीत वाढ करणारा भासत आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारचे चैनल, यूट्यूब चैनल, डिजिटल माध्यम उदयास येत आहेत विविध माध्यमे आपापल्या पद्धतीने उत्तम रित्या सामाजिक प्रश्नांची मांडणी करत आहेत. हे करत असताना काही महत्वाच्या गोष्टीचे भान ठेवणे महत्वाचे आहे. पत्रकारांनी निष्पक्षपातीपणा, विश्वासार्हता टिकविणे अत्यावश्यक आहे, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा :
मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर
अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले
मोठी बातमी : कोल्हापुरात भीषण अपघात ट्रकने ४ मजुरांना चिरडले तर ८ गंभीर जखमी
मी पुन्हा आलो पण येताना दोन्ही पक्ष फोडूनच आलो देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य
ब्रेकिंग : शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला