Saturday, May 4, 2024
Homeआरोग्यकेळी खाताना कोणती काळजी घ्यावी ? वाचा सविस्तर

केळी खाताना कोणती काळजी घ्यावी ? वाचा सविस्तर

महाराष्ट्र आरोग्यनामा : केळी हे सर्व ऋतू मिळणारे फळ असून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. आपण केळी खाण्याचे फायदे आणि तोटे समजून घेतले. आता आपण खालील माहिती पाहूयात. 

केळी खाताना कोणती काळजी घ्यावी ? 

● एका दिवसात एक किंवा दोनच केळी खावीत. 

● केळी हे एकदम सकाळी किंवा रात्री खाऊ नये, कारण यामुळे कफाचा त्रास होण्याची शक्यता असते . सर्दी, खोकला झालेला असताना किंवा दम्याचा त्रास असल्यास केळी खाऊ नयेत. 

● केळी खाल्याने मुलांना सर्दी किंवा कफाचा त्रास होऊ नये, यासाठी मुलांना केळी हे दुपारच्या वेळेसच खाण्यास द्यावे.

● सकाळी उपाशीपोटी केळी खाल्यामुळे पोटात गॅस होणे, पोटदुखी, उलटी, अतिसार यासारखे त्रास होऊ शकतात.

● मधुमेह असल्यास केळी खाणे टाळावे.

● लठ्ठपणा असल्यास किंवा वजन वाढलेले असल्यास केळी खाऊ नयेत. एका केळ्यामध्ये जवळपास १०० ते १२० कॅलरीज असतात त्यामुळे आणखी वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

● कृत्रिमरीत्या पिकविलेली केळी खाऊ नयेत यासाठी बाजारातून केळी आणताना ती नैसर्गिकरीत्या पिकलेली आहेत की नाही ते पाहावे.

● जास्त पिकलेली केळी खाऊ नयेत.

● मधुमेह असल्यास केळी खाणे टाळावे. केळ्यात १४ ग्रॅम साखर असून कर्बोदकेही भरपूर प्रमाणात असतात. केळी खाण्याने रक्तातील साखरेच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय