Saturday, May 18, 2024
Homeराज्यपुढील 5 दिवस राज्यात पुन्हा अवकाळी, ‘या’ 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुढील 5 दिवस राज्यात पुन्हा अवकाळी, ‘या’ 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामान खराब आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रब्बी हंगामातील पिके यामुळे वाया गेली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. असे असताना अद्यापही राज्यावरील पावसाचे सावट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पाऊल होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे. केवळ मध्य महाराष्ट्राच नाही तर कोकणमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे. 13 तारखेला म्हणजेच उद्या मध्य महाराष्ट्रात काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा कोकणात १३ एप्रिल, मध्य महाराष्ट्रात 12 ते 14 एप्रिल दरम्यान तर मराठवाड्यात 14 एप्रिल रोजी काही ठिकाणी गारपिटीची शक्यता विदर्भात 13, 14 एप्रिल रोजी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अरबी समुद्रामध्ये तयार होणारी चक्रीय वादळाची परिस्थिती आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने महाराष्ट्रात पाऊस पडत असल्याचे मत हवामान विभागाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे. या दोन परिस्थितीमुळे आज अर्थातच 12 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रात विशेषता मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊसाची शक्यता कायम राहणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय