Vinesh phogat disqualified : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट यांना अधिक वजनामुळे अपात्र घोषित करण्यात आले होते. महिला कुस्तीच्या 50 किग्रॅ वजनगटातील अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगाटचे 100 ग्रॅम जास्त वजन असल्याने अपात्र घोषित करण्यात आले. या घटनेनंतर विनेश फोगटने (Vinesh Phogat) कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
विनेश फोगटने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने, “आई, माझ्याकडून कुस्ती जिंकली, मी हरले, माफ कर, तुझे स्वप्न, माझे धैर्य सर्व तुटले, यापेक्षा आता माझ्यात ताकद नाही. असे म्हणतं अलविदा कुस्ती 2001-2024 🙏 असे लिहले आहे. तसेच तिने सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि ती सर्वांची ऋणी असेल असे म्हटले आहे.
याआधी कुस्तीपटू विनेशने (Vinesh Phogat) क्रीडा लवादाकडे संयुक्तपणे ऑलिम्पिक रौप्यपदक देण्याची विनंती केली होती. त्याच्या याचिकेवर आज निर्णय अपेक्षित आहे. मात्र, या निर्णयापूर्वीच विनेश फोगटने निवृत्तीची घोषणा केल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा :
विनेश फोगाटच्या अपात्रतेवर राहुल गांधी यांचे ट्वीट
ब्रेकिंग : राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न, झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय
विनेश फोगाटच्या अपात्रतेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले वाचा !
BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या
बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले
मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल