Wednesday, January 15, 2025
HomeNewsव्हिडिओ : जुन्नर - भोसरी पीएमपीएमएल बस सेवा सुरू, राष्ट्रवादी काँग्रेस -...

व्हिडिओ : जुन्नर – भोसरी पीएमपीएमएल बस सेवा सुरू, राष्ट्रवादी काँग्रेस – भाजप मध्ये कलगीतुरा

जुन्नर : जुन्नर-भोसरी पीएमपीएमएल बससेवेचा शुभारंभ शुक्रवारी (दि. ११) किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी करण्यात आला. या मार्गावर ३ बसेस सुरू होत असून त्या दिवसांतून ५ फेऱ्या मारणार आहेत. याप्रसंगी सचिन लांडगे, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे आणि भाजपा नेत्या आशा बुचके यांनी हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ केला.

याप्रसंगी चालक-वाहक तसेच उपस्थितांना लाडू भरवून बस मार्गस्थ झाली. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष तांबे, संतोष खैरे, संजय परदेशी, शहराध्यक्ष गणेश बुट्टे, डॉ. राजश्री इंगवले, महेंद्र सदाकाळ, रोहिदास भोंडवे, हरीश भवाळकर, दिनेश परदेशी, मंदार बुट्टे, निलेश गायकवाड, बाळासाहेब सोनवणे, तृप्ती परदेशी, भगवान घोलप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान ही बस शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बसचे स्वागत करण्यात आले.

किरीट सोमय्या यांचा महापालिकेच्या पायरीवर सत्कार, “त्या” पायऱ्यांचे काँग्रेसकडून गोमुत्र, गुलाबपाण्याने शुद्धिकरण

याप्रसंगी युवानेते अमित बेनके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन केले. याप्रसंगी बेनके बसमध्ये गेल्यानंतर बस तेथेच थांबविण्यात आली. यावेळी भाजपा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे सुमारे अर्धा तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

पोलिस निरीक्षक विकास जाधव व सहकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे बस पुढे गेली. याप्रसंगी शहराध्यक्ष पापाशेठ खोत, नगरसेवक भाऊ कुंभार, ज्येष्ठ नेत्या उज्वला शेवाळे, भूषण ताथेड, सरपंच संतोष केदारी, मयूर महाबरे, बाळासाहेब सदाकाळ, बाजीराव ढोले, रईस पठाण, आरती ढोबळे, जितेंद्र चौधरी, सचिन गिरी, जयेश पुंडे आदी कार्येकर्ते उपस्थित होते.

वाचा ! आपल्याला का वाजते थंडी?

याप्रसंगी बस सेवेबाबत माहिती देताना झेंडे म्हणाले की, गेल्या काही दिवसांत पीएमपीएमएलने २८ गाड्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये सुरू केल्या असून जुन्नर मार्गावरील ३ बसेसपैकी एक बस मुक्कामी असणार आहे. जुन्नरची सेवा ही सर्वाधिक अंतरावरील असून सकाळी ७.३० वाजल्यापासून वेळापत्रकानुसार प्रवाशी या सेवेचा लाभ घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना मासिक पास, अपंग व्यक्तींसाठी विशेष पास तसेच नागरिकांसाठी विविध पास उपलब्ध असणार आहेत. 

दरम्यान ही बससेवा आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातूनच सुरू झाल्याचा दावा जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी याप्रसंगी केला. तर आमदार अतुल बेनके यांनी या सेवेबाबत सर्वप्रथम पत्रव्यवहार केल्याचे अमित बेनके यांनी सांगितले. 

बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती

येत्या काही महिन्यांत होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना राजकीय कलगीतुरा पहायला मिळाला.


संबंधित लेख

लोकप्रिय