Sunday, May 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

व्हिडिओ : गौतमी पाटील च्या कार्यक्रमात अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली !

इतकं मारा की गाxx ची हड्डी तुटली पाहिजे: अब्दुल सत्तार

संभाजीनगर
: शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे बुधवारी (ता. ३) सिल्लोड येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही युवकांनी हुल्लडबाजी केल्यामुळे संतापलेल्या अब्दुल सत्तार यांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. शिवाय, कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबर मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे, इतकं मारा की गाxx ची हड्डी तुटली पाहिजे, असेही सत्तार म्हणाले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

---Advertisement---


गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर समोर बसलेल्या काही युवकांनी हुल्लडबाजी सुरू केली. त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला. त्यामुळे संतापलेल्या अब्दुल सत्तार माईक घेऊन थेट स्टेजवर पोहचले. त्यांनी पोलिसांना उलटबाजी करणाऱ्या तरुणांना आवर घालण्याच्या सूचना दिल्या. मात्र, काही युवक ऐकायला तयार नव्हते. मग काय सत्तार यांचा पारा आणखीनच चढला. सत्तार यांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करून उलटबाजी करणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचे सूचना दिल्या. सत्तार यांनी आदेश देताच बंदोबस्तसाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी थेट समोर बसलेल्यांवर लाठीचार सुरू केला. पोलिसांकडून लाठीमार होताच एकच धावपळ उडाली होती.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ट्वीट करत म्हटले आहे की, ‘महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा… मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला. हजारोंच्या गर्दी सामोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलिस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील “गुंड” समजतात का?…सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिपणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम?’

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles