Vande Bharat Express : देशभरात वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असताना, महाराष्ट्रातील नागपूर ते सिकंदराबाद मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस मात्र बंद होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रातील एक वंदे भारत एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.देशातील सर्वात आधुनिक ट्रेन म्हणून वंदे भारत या ट्रेनचं नाव घेतलं जातं. कारण या ट्रेनचा वेग आणि या ट्रेनमध्ये पुरवल्या जाणाऱ्या सुविधांमुळे ही ट्रेन प्रचंड चर्चेत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक नवीन वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवला आहे. मात्र आता महाराष्ट्रातील सिंकदराबाद ते नागपूर ही ट्रेन बंद होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील प्रवाशांची संख्या कमी असून, ट्रेनच्या 80% सीट्स रिकाम्या राहत असल्याने हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.फक्त 20 टक्के क्षमतेनं ही ट्रेन धावत आहे. त्यामुळे या ट्रेनचे अनेक डब्बे हे रिकामेच असतात.
16 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या वंदे भारत एक्सप्रेसमधील एकूण 1,440 सीट्सपैकी 1,200 सीट्स रिकाम्या असल्याचे समोर आले आहे. विशेषत: एक्झिक्युटिव्ह क्लासमधील 88 सीट्सपैकी केवळ 10 सीट्सच रिझर्व्ह झाल्या होत्या. या परिस्थितीमुळे रेल्वे प्रशासनाने सुरुवातीला या ट्रेनच्या डब्यांची संख्या कमी करण्याचा विचार केला आहे. सध्या या ट्रेनला 20 डब्बे आहेत, मात्र कमी प्रतिसादामुळे त्यांची संख्या 8 पर्यंत कमी केली जाऊ शकते.असं रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सर्वात आधुनिक आणि वेगवान ट्रेन असून, प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र नागपूर-सिकंदराबाद मार्गावरील प्रवाशांच्या अभावामुळे ही ट्रेन बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Vande Bharat Express


हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी
दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर