बिना : भोपाळहून नवी दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला आग लागल्याची घटना घडली आहे. वंदे भारत ट्रेनच्या C14 बोगीला बोगीला ही आग लागली होती. या आगीमुळे एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या मिहितीनुसार, भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला ही आग लागली आहे. सोमवारी सकाळी 7.30 वा मध्यप्रदेशातील बिना स्टेशनला उभी असताना आग लागली. या आगीची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. ट्रेनच्या C14 बोगीला ही आग लागली. डब्याखालील बॅटरीमधून आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळाताच सर्व प्रवाशांना ट्रेनमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने आग आटोक्यात आणली. आगीमुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या घटनेची रेल्वेकडून चौकशी करण्यात येत आहे.
वंदे भारत एक्स्प्रेससोबत झालेल्या इतर घटना
गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली होती. गोरखपूरहून लखनौला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती. अयोध्येतील सोहवल येथे 10-11 जुलैच्या मध्यरात्री दगडफेकीची घटना घडली होती. दगडफेकीमुळे सी 1, सी 3 आणि एक्झिक्युटिव्ह कोचच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या. या सोबतच कर्नाटक, बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.
हे ही वाचा :
आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार
समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून
अभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार ? ‘या’ पक्षात होणार सहभागी चर्चांना उधान
धक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या
‘सीमे’पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण
MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज
मोटार : एक मानवीनिर्मित अरिष्ट – नवनाथ मोरे
मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज