Wednesday, May 1, 2024
HomeNewsValentine's Day: काय सांगता! १० कोटी लोकांना कंडोम वाटप; 'या' देशाने घेतला...

Valentine’s Day: काय सांगता! १० कोटी लोकांना कंडोम वाटप; ‘या’ देशाने घेतला निर्णय

फेब्रुवारी महिना आला की व्हॅलेंटाइन डे ची चाहुल लागते. तरुणाईमध्ये व्हॅलेंटाइन डेचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. प्रत्येकजण आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी, प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी आतुर असतो.या वॅलेंटाईन वीकसाठी मोठी तयारीही केली जाते. पण सध्या या वॅलेंटाईन वीकसाठी थायलंडने एक चकित करणारा निर्णय घेतला आहे. थायलंड देशामध्ये वॅलेंटाईन वीकमध्ये देशभरात कंडोम वाटप करण्यात येणार आहे.

व्हॅलेंटाइन डे निमित्त थायलंड प्रचंड चर्चेत आलंय. थायलंड व्हॅलेंटाइन डे निमित्त देशातील तब्बल 10 करोड लोकांना कंडोम देणार आहे. यामागे किशोरवयीन गर्भधारणा टाळण्यासाठी, लैंगिक आजारांपासून बचाव, सुरक्षित सेक्स, सामाजिक स्वास्थ्य अशी अनेक कारणं आहेत.

थायलंडने सुरक्षित लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि किशोरवयीन गर्भधारणा टाळण्यासाठी व्हॅलेंटाइन डेपूर्वी 95 दशलक्षाहून अधिक कंडोम देण्याची योजना आखली आहे. सिफलिस, गोनोरिया, क्लॅमिडीया, एड्स आणि सर्वाइकल कैंसर यासारख्या लैंगिक संबंधित आजारांना (STD)आळा घालण्याचे दक्षिण आशियाई सरकारचे उद्दीष्ट आहे.

थायलंडमध्ये 2021 मध्ये 15 ते 19 वयोगटातील 1000 थाई मुलींपैकी 24.4 मुलींनी जन्म दिला. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार याच वयोगटातील मुलींचे जागतिक प्रमाण 42.5 आहे. गेल्या काही वर्षांत लैंगिक आजारांमध्ये (STD) झालेली वाढ लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आले आहे. नवीन अधिकृत आकडेवारीनुसार, 2021 मध्ये STD मुळे सर्वात जास्त प्रभावित 15 ते 19 आणि 20 ते 24 वयोगटातील लोक होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय