Sunday, July 14, 2024
Homeराज्यइम्तियाज जलील यांच्या युतीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

इम्तियाज जलील यांच्या युतीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नुकतीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली. जलील यांच्या या ऑफरनंतर राज्यातील राजकारणात चर्चेला उधान आले आहे.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या खासदार आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित करताना जलील यांनी दिलेल्या प्रस्तावावर आपली भुमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी हा एमआयएमचा कट असल्याचं सांगत तो उधळून लावण्याचं आवाहन केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु असून शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा. विरोधक काय खुरापती करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विरोधक विरोध करत राहणार पण आता तितक्याच ताकदीनं आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.  

तसेच, यावेळी ठाकरे यांनी भाजपाने मेहबुबा मुफ्तींसोबत केलेल्या युतीची आठवण करुन देत ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत. आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत. महाविकास आधाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे, असे ठाकरे यावेळी म्हणाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय