Wednesday, May 1, 2024
HomeNewsकष्टकरी संघर्ष महासंघाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव

कष्टकरी संघर्ष महासंघाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव

कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज ईळवे,राष्ट्रवादी कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांच्या हस्ते झाला सन्मान.

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: दि.८
– संस्कार प्रतिष्ठान तर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दरवर्षी संस्कार जत्रा भरवण्यात येते,यात दरवर्षी राज्यभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तव्यदक्ष व्यक्तींचा संस्थांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी सुमारे ३७ हजार सभासद असलेल्या कष्टकरी संघर्ष महासंघाला यावर्षीचा कामगाररत्न संघटना पुरस्कार म्हणून निवड झाली अध्यक्ष कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज ईळवे, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

यावेळी अभिनेत्री मोहिनी कुडेकर,विश्वेश्वर मंडळाचे महेश कलाल,टाटा मोटर्स चे अशोक माने,प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, महिला अध्यक्ष माधुरी जलमुलवार, क्रांती महासंघाच्या महिला अध्यक्ष वृषाली पाटणे,अरुणा सुतार,मुमताज शेख, सीमा जगताप, लता गोरे, रेखा शिंदे, सुमित्रा जयस्वाल,संगीता कांबळे,अर्चना कांबळे, सुनीता पोतदार, जरिता वाटोरे, नंदा तेलगोटे, निरंजन लोखंडे, महादेव गायकवाड, तुकाराम माने,आबा शेलार, फरिद शेख, मनोज यादव,नाना कसबे यांचेसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त रविराज ईळवे यांनी संस्कार प्रतिष्ठानचे कार्याबद्दल कौतुक करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा देत असे पुरस्कार सोहळे आणि काम करणाऱ्या संघटनाचां गौरव होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. शिवाजीराव खटकाळे यांनी कामगार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून कामगार चळवळ टिकली पाहिजे असे मत व्यक्त केले .काशिनाथ नखाते यांनी सर्व कष्टकरी कामगार बांधावासह हा पुरस्कार स्वीकारला .

पुरस्काराला उत्तर देताना म्हणाले की संघटनेच्या माध्यमातून बांधकाम कामगार,फेरीवाला, रिक्षाचालक, घरेलू कामगार,वाहन चालक , सफाई कामगार आदी कष्टकरी कामगारांनी संघटनेवर मोठा विश्वास दाखवला त्यामुळेच आपण हे मोठे काम करू शकलो. हजारोच्या संख्येने कष्टकरी कामगार संघटनेसोबत जोडले आणि आपले प्रश्नमार्गी लागण्याचे मार्ग सुरू झाले . पुरस्काराने जबाबदारी तर वाढतेच परंतु कार्याला खूप मोठी प्रेरणा मिळत असते. महाराष्ट्रभर काम मोठ्या जोमाने करून राज्यातील कष्टकरी कामगारांना दिलासा देण्याच काम नक्कीच करण्याचा प्रयत्न या पुढच्या कालावधीमध्ये राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय