Thursday, April 18, 2024
HomeNewsबाहेरचे 'उद्योग' बंद! इंडोनेशियामध्ये सेक्ससंबंधी नवा कायदा; टूरिस्ट इंडस्ट्री धोक्यात

बाहेरचे ‘उद्योग’ बंद! इंडोनेशियामध्ये सेक्ससंबंधी नवा कायदा; टूरिस्ट इंडस्ट्री धोक्यात

इंडोनेशिया सरकारने सेक्ससंबंधी एक कायदा आणला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष इंडोनेशियावर लागलं आहे. त्याचा परिणाम इंडोनेशियाच्या टूरिस्ट इंडस्ट्रीवर पडणार, हे मात्र नक्की.सध्या पर्यटक इंडोनेशियामध्ये जाण्यात धजावत नाहीत. तिथली टूरिस्ट इंडस्ट्रीसुद्धा घाबरुन गेली आहे. त्याचं कारण इंडोनेशिया सरकारने विवाहबाह्य संबंध कायद्याने रोखले आहेत. लग्न झालेलं असेल तर बाहेर सेक्स करण्याला पायबंद घालण्यात आलेला आहे.

इंडोनेशियाच्या या कायद्याची तुलना ऑपनिवेशिक युगाशी केली जात आहे. पर्यटनाशी संबंधित लोकांना बाहेर देशातून येणाऱ्या पर्यटकांची चिंता लागून राहिली आहे. पर्यटक आले नाही तर त्यांच्या रोजीरोजीवर परिणाम होणार आहे.
सरकारच्या या नवीन कायद्यामुळे पर्यटक आणि गुंतवणूकदार इंडोनेशियाकडे पाठ फिरवतील, असंही सांगितलं जात आहे. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेला होऊ शकतो. देशाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच या कोडला मंजुरी दिली.

या कायद्याचं उल्लंघन केल्यास एक वर्षाचा तरुंगवास किंवा मोठा दंड आकारला जाणार आहे. हा कायदा अविवाहित जोडप्यांना एकत्र राहण्यास मज्जाव करतो. या नियमांची अंमलबजावणी इंडोनेशियामध्ये सुरु आहे. असं कुठे आढळून आल्यास हॉटेल्सवर छापेही मारले जाणार आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय