बार्शी : बार्शी मध्ये पुरोगामी पक्ष, संस्था, संघटना यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत दिनांक 17 जानेवारी 2022 वार सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजता शाहीर अमर शेख चौक येथे कष्टकऱ्यांचे नेते प्रा.डॉ. भाई एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले ” भाई एन.डी. पाटील यांनी संपूर्ण हयात कष्टकरी वर्गाशी एकनिष्ठ राहून काम केले, रोजगार हमी कायदा, शिक्षणाचे प्रश्न, टोलचा प्रश्न, विधानसभेमध्ये असलेला नैतिक दबदबा, अनिसचे काम असेल, रयत शिक्षण संस्थेची जबाबदारी या सर्व बाबी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरक व मार्गदर्शक ठरत राहतील, शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे व भाई एन.डी. पाटील यांनी एकत्र काम केल्याची आठवण देखील त्यांनी सांगितली”.
हेही वाचा ! प्रा. एन. डी. पाटील यांची राजकीय सामाजिक कारकीर्द
यावेळी दलित चळवळीचे श्रीधर कांबळे, कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद, माजी नगरसेवक वाहिद शेख, कॉम्रेड बालाजी शितोळे, कॉम्रेड सुयश शितोळे, अनिसचे उत्मेष पोतदार, दलित स्वयंसेवक संघाचे राजाभाऊ कसबे, अबैद सय्यद, खाजामिया दावारी, बाबा डमरे, किसान सभेचे धनाजी पवार, ग्रंथालय संघाचे विनोद गायकवाड, एआयएसएफ चे कॉ. भारत पवार, जेष्ठ पत्रकार गव्हाने आदी उपस्थित होते.
हेही वाचा ! प्रा. एन. डी. पाटील यांचा अंत्यविधी कोणत्याही कर्मकांडा शिवाय होणार !
नोकरीची संधी : नवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी !