कोल्हापूर : महाराष्ट्रातील प्रबोधन, पुरोगामी, परिवर्तनवादी, कष्टकरी, शेतकरी, कामगार चळवळींचे अग्रणी ज्येष्ठ नेते, रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्रा डॉ.एन.डी. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी कालवश झाले. आज मंगळवार ता. १८ जानेवारी रोजी राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या (कदमवाडी रोड, सदरबाजार ) मैदानावर सकाळी ८ ते २ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही दिवंगत ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी दिवंगत प्रा.एन.डी.पाटील यांच्या पत्नी सरोज उर्फ माई, मुलगा प्रशांत व सुहास पाटील यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्य, खासदार, आमदार, शिक्षण, सहकार क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, कामगार, नागरिक यांनीही प्रा.एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
हेही वाचा ! प्रा. एन. डी. पाटील यांची राजकीय सामाजिक कारकीर्द
कोरोनाच्या नियमांमुळे अंत्ययात्रा निघणार नाही. तसेच एन.डी. पाटील समाजवादी प्रबोधिनीचे व अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन व विवेकवादी चळवळीचे अग्रणी असल्याने कोणत्याही कर्मकांडा शिवाय त्यांचा अंत्यविधी होणार आहे.
कोरोनाच्या नियमांमुळे केवळ वीस लोकांच्या अर्थात कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यविधी होणार आहे. तरी कार्यकर्त्यांनी शाहू कॉलेजवर अंत्यदर्शनासाठी यावे मात्र अंत्यविधीच्या ठिकाणी गर्दी करू नये आवाहन तसेच मास्क, फिजिकल डिस्टनसिंग ,आणि महाविद्यालय परिसरात पार्किंग नियमांचे पालन करावे असे, आवाहन एन.डी.पाटील यांच्या पत्नी सरोजताई उर्फ माई पाटील व कुटुंबियांनी केले आहे.
हेही वाचा ! ज्योती बसू : पक्ष निर्णयानुसार पंतप्रधान पद नाकारणारे, पश्चिम बंगालचे सलग २३ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नेते
नोकरीची संधी : नवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी !