पुणे : माजी खासदार आणि जनता पक्षाचे नेते संभाजीराव (लाला) काकडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. नव्वद वर्षीय लाला काकडे यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. एकेकाळी शरद पवारांचे राजकीय विरोधक म्हणून काकडे यांची ओळख होती.
बारामती तालुक्यातील निंबुत येथील एक वजनदार घराणे म्हणून काकडेंचा लौकिक होता. 1967 साली काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होते. तसेच, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या निकटच्या सहकाऱ्यांपैकी एक होते. मागील वर्षभरापासून काकडे आजारी होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा अंत्यविधी उद्या (दि.10) दुपारी 2:30 वाजता होणार आहे.