पुणे : भाजप चे माजी युवा सरचिटणीस वैजनाथ शिरसाट यांच्यासह भोसरी विधान सभा क्षेत्रातील धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या अनिता अधिकारी यांनीही त्यांच्या 45 कार्यकर्त्यांसह आम आदमी पार्टीत मध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेशासाठी पिंपरी चिंचवड आम पक्षाचे शहराध्यक्ष अनुप शर्मा, शहर प्रवक्ता कपिल मोरे, ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. आम आदमी पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक विजय कुंभार, जिल्हा संयोजक मुकुंद किर्दत, आप संघटन मंत्री अभिजित मोरे आणि आप राज्य ट्रान्सपोर्ट विंग चे अध्यक्ष श्रीकांत आचार्य यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला. कोरोनाच्या परिस्थितीमूळे झुम ॲप द्वारे ऑनलाइन पद्धतीने हा प्रवेश सोहळा झाला.
वैजनाथ शिरसाट हे वंजारी समाजातील एक लढवय्ये कार्यकर्ते आहेत. ओबीसी संघर्ष सेना पिंपरी चिंचवड या संघटनेचे ते शहराध्यक्ष आहेत. त्यांनी ओबीसीतील अठरा पगड जातींना एक करून संघटन उभे केले आहे. शहरातील स्थानिक ओबीसी ही या संघटनेबरोबर आहेत, दिड हजारहून जास्त सदस्य संघटनेत काम करतात समाजासाठी वैजनाथ शिरसाठ अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
भाजप हा आता मुंडे -महाजन- वाजपेयी यांचा पक्ष राहिला नसून भाजपमधील निष्ठावंत नाराज कार्यकर्त्यांनाही पुढच्या काळात आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश देऊन लढण्याचे बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले वैजनाथ यांनी सांगितले.
तसेच महिला नेत्या अनिता अधिकारी यांनी ही त्यांच्या अनेक कार्यकत्यांसह पक्ष प्रवेश केला. अनिताताई या नारी शक्ती महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत व घरकुल चिखली मध्ये महिला बचत गट चालवत आहे. या संघटनेच्या माध्यमातून ते शहरातील महिलांच्या विविध विषयांवर काम करतात. तसेच ते चिखली पोलीस स्टेशनच्या दक्षता समितीवर ही कार्यरत आहेत.
आप चे राज्य संघटक विजय कुंभार यांनी सर्वांचे स्वागत केले. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या कामातून भ्रष्ट व्यवस्थेवर मोठा दबदबा निर्माण केला पाहिजे व अश्या नवीन जोडलेले कार्यकर्ते ते करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
वैजनाथ यांच्या येण्याने आम आदमी पक्षाला मोठे बळ मिळणार असून शहराला ओबीसी समाजाचे प्रश्न घेऊन लढणारा एक लढवय्या नेता मिळाला आहे. तसेच अनिता अधिकारी या शहर महिलांच्या लढाईला बळ देतील अशी भावना या वेळी आपचे शहराध्यक्ष अनुप शर्मा यांनी व्यक्त केली
आप संघटन मंत्री अभिजित मोरे यांनी ह्या दोघांच्या येण्याने शहारत पक्ष संघटन मजबूत होईल अशी आशा व्यक्त केली व पक्षाच्या मूलभूत विचारसरणी समजून सांगितली व त्याच्या चौकटीत बसणारे अजून अनेक कार्यकर्ते पक्षात घेण्याची गरज व्यक्त केली.
आम आदमी पक्षाच्या माध्यमातून स्त्रियांच्या प्रश्नावर काम करण्यास अधिक बळ मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अनिता ताई यांच्या येण्याने पक्षाच्या महिला विंग ला मोठी ताकत मिळेल असे मत आप शहर महिला अध्यक्षा स्मिताताई पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी आम आदमी पार्टी चे प्रदेश संघटक विजय कुंभार, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, संघटनमंत्री अभिजित मोरे, आप वाहतूक अध्यक्ष श्रीकांत आचार्य, आप पुणे जिल्हा सामाजिक न्याय विंग अध्यक्ष वहाब शेख, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अनुप शर्मा, महिला अध्यक्ष स्मिताताई पवार, महिला उपाध्यक्ष मधुरिताई गायकवाड, भोसरी विधानसभा अध्यक्ष मोसीन खान, शहर प्रवक्ता कपिल मोरे, ज्येष्ठ कार्यकरते किशोर जगताप व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.