Thursday, January 9, 2025
Homeताज्या बातम्यामुंबईत 1.25 लाख गुंतवणूकदारांची 1,000 कोटी रुपयांची फसवणूक

मुंबईत 1.25 लाख गुंतवणूकदारांची 1,000 कोटी रुपयांची फसवणूक

Torres Company Scam : दागिने आणि हिऱ्यांमध्ये गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या टॉरेस ज्वेलरी कंपनीने तब्बल 1.25 लाख गुंतवणूकदारांची 1,000 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. कंपनीने आठवड्याला 6% ते 10% परतावा आणि एका वर्षात गुंतवणुकीच्या तिप्पट रक्कम देण्याचे वचन देऊन लोकांकडून मोठी गुंतवणूक करून घेतली. मात्र, कंपनीने अचानकपणे आपले ऑपरेशन बंद करत सर्व गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक धक्का दिला आहे.

फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबईत सुरू झालेल्या या कंपनीने दादरमध्ये फ्लॅगशिप शोरूम आणि नवी मुंबई, कल्याण, बोरिवली, तसेच मीरा रोड येथे शाखा उघडल्या होत्या. लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी 6% चा साप्ताहिक परतावा देण्याचे तसेच 52 आठवड्यांत गुंतवणुकीच्या रकमेच्या तिप्पट पैसे मिळण्याचे आमिष दाखवले. प्रत्येक गुंतवणूकदारासाठी डिजिटल खाते व ग्राहक आयडी तयार करण्यात आला, ज्यामुळे गुंतवणूकदारांना अधिकृत आणि विश्वासार्हतेचा आभास निर्माण झाला.

या फसवणुकीमागे युक्रेनियन नागरिक जॉन कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवालेन्को असल्याचा पोलिसांचा संशय आहे. हे दोघे देश सोडून फरार झाले असून त्यांच्याविरोधात लुकआउट सर्कुलर (LOC) जारी करण्यात आले आहे.

(Torres Company Scam)

या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) हाती घेतला आहे. महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ डिपॉझिटर्स ॲक्ट आणि भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली असून तपास अधिक गतीने सुरू आहे.

संचालक सर्वेश सुर्वे बळीचा बकरा?

कंपनीने आपले परदेशी ऑपरेशन लपवण्यासाठी सर्वेश सुर्वेला संचालक म्हणून नियुक्त केले. पोलीस तपासात असे समोर आले आहे की, सुर्वेला या फसवणुकीच्या मोठ्या कटाचा कोणताही अंदाज नव्हता आणि तो केवळ सोयीस्कर बळीचा बकरा बनवला गेला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

चोरी करायला गेला अन् महिलेचा मुका घेऊन आला, आरोपी अटकेत

आळंदीच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार

दिल्ली विधानसभा निवडणूकीची घोषणा, वाचा कधी होणार मतदान

52 वर्षीय गोली श्यामला यांचा 150 किमी समुद्रात पोहण्याचा विक्रम

मोठी बातमी : HMPV व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव, दोन मुलांना संसर्ग

मोठी बातमी : लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये ; सरकारकडून मोठी घोषणा

ओयो हॉटेल्सकडून नवी चेक-इन धोरण ; अविवाहित जोडपी अडचणीत ?

संबंधित लेख

लोकप्रिय