मुंबई, दि. ७ : मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (आर्टी) आता आपले कार्यक्षेत्र अधिक विस्तारले आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी विविध योजना व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. संस्थेच्या नोंदणीनंतर आता मातंग समाजातील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकासासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (arti org)
उमेदवारांसाठी संधी
आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक उमेदवारांना त्यांच्या आवडीप्रमाणे प्रशिक्षण निवडता येईल. अर्जाची छाननी करून निवड झालेल्या उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उमेदवारांना नोकरीची संधी तसेच स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदतीसाठी प्रयत्न केले जातील.
प्रशिक्षण कार्यक्रम (arti org)
स्पर्धा परीक्षा :
एमपीएससी, युपीएससी
बॅंक (आयबीपीएस), रेल्वे
जेईई-नीट, युजीसी-नेट/सेट
पोलीस व लष्करी भरती
कौशल्य विकास :
परदेशात नोकरी व शिक्षणाची संधी
शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण
हार्डवेअर व सॉफ्टवेअर कोर्सेस
संगणक प्रमाणपत्र कोर्सेस
शैक्षणिक योजना :
पीएच.डी. व पोस्ट पीएच.डी. संशोधनासाठी फेलोशिप
असा करा अर्ज
इच्छुक उमेदवारांनी आर्टीच्या संकेतस्थळावर भेट देऊन नोटीस बोर्डवरील गुगल फॉर्म लिंक भरावी किंवा दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून अर्ज पूर्ण करावा.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
चोरी करायला गेला अन् महिलेचा मुका घेऊन आला, आरोपी अटकेत
आळंदीच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार
दिल्ली विधानसभा निवडणूकीची घोषणा, वाचा कधी होणार मतदान
52 वर्षीय गोली श्यामला यांचा 150 किमी समुद्रात पोहण्याचा विक्रम
मोठी बातमी : HMPV व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव, दोन मुलांना संसर्ग
मोठी बातमी : लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये ; सरकारकडून मोठी घोषणा