मुंबई, दि. 7 : राज्यातील सर्व चार चाकी वाहनधारकांसाठी 1 एप्रिल 2025 पासून फास्ट टॅग अनिवार्य (Fasttag is mandatory) करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला.
फास्ट टॅगच्या वापरामुळे टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल, असा सरकारचा दावा आहे. फास्ट टॅग कार्यरत नसेल, तर वाहनधारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट रकमेचा भुर्दंड सोसावा लागेल.
जर वाहनचालक फास्ट टॅग ऐवजी रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, क्रेडिट/डेबिट कार्ड, कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथकर भरत असतील, तरी त्यांना दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे.
कोठे होणार अंमलबजावणी? (Fasttag)
- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) अंतर्गत 50 टोल नाके.
- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 23 टोल नाके.
या सर्व टोलनाक्यांवर 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
चोरी करायला गेला अन् महिलेचा मुका घेऊन आला, आरोपी अटकेत
आळंदीच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार
दिल्ली विधानसभा निवडणूकीची घोषणा, वाचा कधी होणार मतदान
52 वर्षीय गोली श्यामला यांचा 150 किमी समुद्रात पोहण्याचा विक्रम
मोठी बातमी : HMPV व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव, दोन मुलांना संसर्ग
मोठी बातमी : लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये ; सरकारकडून मोठी घोषणा