Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशभरात टोमॅटोची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. एरवी टोमॅटोचे दर हे 30 ते 40 रुपये किलो असतात मात्र आता मुंबईसह देशातील अनेक शहरांत टोमॅटोचे दर 150 पार गेले आहेत. अर्थात एक प्रकारे टोमॅटोने पेट्रोल डिझेलचे आता पर्यतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे.

---Advertisement---

देशातील अनेक भागात टोमॅटोचे भाव 150 रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. घाऊक मंडईतही त्याचे भाव 60 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्र, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये प्रचंड वाढले आहेत.

टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा फायदा घेत मध्य प्रदेशच्या अशोकनगर येथील एका मोबाईल विक्रेत्याने अनोखी ऑफर आणली आहे. या दुकानातून स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दुकानदार 2 किलो टोमॅटो मोफत देत आहेत. या ऑफरची चर्चा सर्वत्र रंगली असून ग्राहकांच्या देखील यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

---Advertisement---

दरम्यान, ही ऑफर सुरू होताच दुकानात ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आम्हाला नफाही होत असून ग्राहकही टोमॅटो मिळाल्याने खूश आहेत. मला वाटते की मोबाईलसोबत एक किलो टोमॅटो लोकांच्या घरी पोहोचला तर त्यांना थोडा दिलासा मिळेल असे या दुकानाचे मालक अभिषेक अग्रवाल यांनी माध्यमांना सांगितले.

हे ही वाचा :

प्रेमासाठी पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमाची तुरुंगातून सुटका, सरकारकडे केली ‘ही’ मागणी

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

‘हा आपल्या दोघांतील मुलभूत फरक’ खा. कोल्हेंचे आढळराव पाटील यांना प्रत्यूत्तर

ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्या शिंदे गटात

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles