Wednesday, May 8, 2024
Homeविशेष लेखप्रतिकूल सामाजिक स्थितीत स्त्रीशिक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती

प्रतिकूल सामाजिक स्थितीत स्त्रीशिक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती

ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) ह्या शिक्षिका होत्या. असे म्हणतात की, त्या काळी आधुनिक शिक्षण घेण्यास महिलांना अनुमती नव्हती. त्याविरुद्ध त्यांनी संघर्ष केला.सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते. १८४१ मध्ये सावित्रीबाई फुले यांचा विवाह जोतिराव फुले (Jotirao Phule) यांच्याशी झाला.



पहिल्या शेतकरी शाळेच्या संस्थापक

सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) या भारतातील मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि पहिल्या शेतकरी शाळेच्या संस्थापक होत्या. ज्योतिराव हे महाराष्ट्रातील आणि भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीतील (Social reform movement) एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जातात. महिला आणि दलित जातींना शिक्षित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी ते ओळखले जातात.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य

पुढे जोतिराव यांना लोक आदराने ज्योतिबा म्हणून लागले. असे म्हणता येईल की, सावित्रीबाईंचे ते गुरु होते. त्यांच्या तालमीत सावित्रीबाई तयार झाल्या. सावित्रीबाईंनी विधवा पुनर्विवाह (Widow remarriage), अस्पृश्यता निर्मूलन (Abolition of untouchability), स्त्रियांना सामाजिक बंधनातून मुक्त करणे आणि दलित स्त्रियांना शिक्षित करणे हे ध्येय समोर ठेवले आणि तसे कार्य देखील केले. विशेष म्हणजे त्या उत्तम कवयित्रीही होत्या.


प्लेगच्या रुग्णांची सेवा

५ सप्टेंबर १८४८ रोजी त्यांनी आपल्या पतीच्या मदतीने विविध जातीतील नऊ विद्यार्थिनींना घेऊन पुण्यात महिलांसाठी शाळा (School for Women) स्थापन केली. एका वर्षात सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांना प्रचंड यश लाभले आणि त्यांनी मिळून पाच नवीन शाळा सुरू केल्या. ब्रिटिश सरकारने त्यांचा खूप गौरव केला. प्लेगच्या साथीच्या काळात सावित्रीबाई प्लेगच्या रुग्णांची सेवा करत होत्या. त्यामुळे त्यांनाही संसर्ग झाला. १० मार्च १८९७ रोजी सावित्रीबाई फुले यांचे प्लेगमुळे निधन झाले.

सावित्रीबाईंचा जन्मदिवस ३ जानेवारी रोजी महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. २०१७ रोजी गुगलने त्यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमित्त गुगल डुडल बनवून त्यांना अभिवादन केले होते. त्याचबरोबर २०१५ मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) असे करण्यात आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय